नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात पावसानेे सरासरी 90 टक्के हजेरी लावली आहे. मध्यंतरी जोरदार हजेरी लावल्यानंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी (दि. 4) पुन्हा काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपात हजेरी लावली. त्यात इगतपुरीत 8.7 मिलिमीटर, दिंडोरी 3.1, मालेगाव 3.3 आणि त्र्यंबकेश्वरला 1.4 मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला.
याशिवाय येवला तालुक्यात 0.7 मिमी, तर सुरगाणा, पेठ या डोंगराळ भागात अनुक्रमे 1.3 व 2.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नाशिक विभागाचा (नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार व अहिल्यानगर) सरासरी पर्जन्य 707.1 मिलिमीटर असून, प्रत्यक्ष पाऊस 693.8 मि.मी. (98.1 टक्के) आहे. त्यामुळे संपूर्ण विभागात हंगाम समाधानकारक असल्याचे हवामान खात्याचे मत आहे.
यंदा पाऊस जास्त प्रमाणात
जिल्ह्याचे सरासरी पर्जन्य 933 मिलिमीटर आहे. आतापर्यंत 841.40 मिलिमीटर (90.1 टक्के) पाऊस झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पाऊस थोडा जास्त प्रमाणात आणि नियमित कालावधीत झाला आहे. नांदगाव, दिंडोरी, मालेगाव आणि येवला या तालुक्यांनी सर्वाधिक पर्जन्य टक्केवारी (125 पेक्षा जास्त) नोंदवली आहे. इगतपुरी व सुरगाणा या पावसाळी पट्ट्यात मात्र पाऊस कमी (70-75 टक्के) झाला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात सरासरी 2175 मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित असताना, 2122 मि.मी. पावसाची नोंद झाली. पेठ तालुक्यात सरासरी 2053 पावसाची नोंद होते. यंदा मात्र 1923 मि.मी. पावसाची नोंद झाली. इगतपुरी तालुक्यात सरासरी 3070 मिलिमीटर पाऊस होतो. यंदा 2093 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सुरगाणा तालुक्यात सरासरी 1907 मि.मी. पाऊस होतो. यंदा 1425 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
तालुकानिहाय पर्जन्यमान (जून ते ऑक्टोबर 2025 पर्यंत) :
तालुका सरासरी (मिमी) प्रत्यक्ष (मिमी)
मालेगाव 457.7 610.2 133.3
बागलाण 488.2 508.0 104.1
कळवण 639.6 559.4 87.5
नांदगाव 491.4 667.9 135.9
सुरगाणा 1895.7 1424.5 75.1
नाशिक 695.2 833.4 119.9
दिंडोरी 679.2 884.3 130.2
इगतपुरी 3058.0 2073.2 67.8
पेठ 043.0 1920.6 94.0
निफाड 462.3 583.9 126.3
सिन्नर 522.4 560.3 107.3
येवला 453.7 593.3 130.8
चांदवड 529.5 549.7 103.8
त्र्यंबकेश्वर 2166.1 2117.5 97.8
देवळा 422.7 419.7 99.3
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…