नाशिक

मालमत्ता कर नोंदणीकडे पाठ

122 केंद्रांवर अवघे दहा अर्ज

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील ज्या मिळकती अद्याप कराच्या कक्षेत आलेल्या नाहीत, त्यांची महापालिकेकडे अधिकृत नोंद हवी याकरिता महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर नोंदणी व निर्धारणासाठीचे विशेष शिबिराचे 1 ऑक्टोबरपर्यंत आयोजन केले आहे. पण पहिल्या दिवशी नागरिकांनी शिबिराकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. 31 प्रभागांतील 122 केंद्रांत अवघे दहा अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या या उपक्रमाला मात्र धक्का बसला आहे.
शहरात महापालिकेकडे अधिकृत सहा लाख 25 हजार मिळकती कराच्या कक्षात आहेत; परंतु याव्यतिरिक्त अनेक ठिकाणी मिळकती असून, त्यांची अधिकृतपणे महापालिकेकडे नोंद झालेली नाही. यामुळे महापालिकेचा महसूल बुडत असल्याने आर्थिक नुकसान होत आहे. याकरिता महापालिका प्रशासनाने मंंगळवारपासून (दि. 22) शिबिर आयोजित केले आहे. प्रत्येक प्रभागात चार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
नागरिकांना विभागीय कार्यालय व मनपा मुख्यालयात चकरा मारण्याची आवश्यकता लागू नये यासाठी करसंकलन विभागाने नागरिकांच्या सोयीकरिता या शिबिराचे आयोजन केले होते.
याकडे मिळकतदारांनी पाठ फिरविल्याने या उपक्रमाच्या उद्देशालाच फटका बसला आहे. मालमत्तांची नोंद करण्यासाठी 1 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घेऊन अनोंदणीकृत मिळकती अधिकृत करून घ्याव्यात, असेे आवाहन करसंकलन विभागाचे उपायुक्त नितीन पवार यांनी केले आहे.

60 ते 70 हजार अनोंदणीकृत मालमत्ता?
शहरात 60 ते 70 हजार अनोंदणीकृत मालमत्ताधारक असण्याची शक्यता आहे. या मालमत्ता कराच्या कक्षेत आल्यास कोट्यवधीचा महसूल महापालिकेला मिळेल. पण मिळकतीची अधिकृत नोंद न करता त्या तशाच ठेवल्या जात आहेत.

स्थायी सदस्याचा फुसका बार
गेल्या स्थायी समिती सभेत एका सदस्याने मोठ्या तावातावात आपल्या प्रभागातील नागरिकांच्या मिळकतींची नोंद करण्यासाठी पाच ते दहा हजारांची मागणी कर्मचारी करत असल्याचा आरोप केला होता. प्रशासनाने मिळकतीची नोंद करण्यासाठी शहरात उपक्रम राबविण्याची मागणी करत याद्वारे महापालिकेला शंभर ते दीडशे कोटींचा महसूल मिळेल, अशी भीमगर्जना केली होती. पण आता महापालिकेने शिबिर घेतले असता, या सदस्याच्या प्रभागासह शहरातून कोणीही मालमत्ता नोंदणीसाठी पुढे आलेले नाही. त्यामुळे त्या सदस्याचा फुसका बार ठरल्याचे चित्र आहे.

Back to property tax registration

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

लाल कांद्याच्या दरात 400 रुपयांची घसरण

लासलगाव : वार्ताहर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार (दि. 19) आणि शुक्रवार (दि. 20)…

23 hours ago

सगुण-निर्गुण एकचि पांडुरंग!

कार्तिकी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी…

23 hours ago

थेट विरोध

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरूच आहे. शरद पवारांच्या आजारपणात विलीनीकरणाची चर्चा…

23 hours ago

ड्रेनेज, पाणीपुरवठ्याच्या 370 कोटींच्या खर्चाला मंजुरी

सिंहस्थासाठी साधुग्राममध्ये पंधराशे एकरमध्ये काम होणार नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राममध्ये विविध…

24 hours ago

इलेक्ट्रिक बससाठी स्वतंत्र पासची आवश्यकता नाही

अतिरिक्त भाडेही नाही; सिटीलिंकची माहिती नाशिक : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाशिकसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस…

1 day ago

स्वीकृतच्या दहा नगरसेवकांची अखेर नियुक्ती

महासभेत घोषणा; दुसरी जागा ठाकरे गटाने मिळवलीच नाशिक : प्रतिनिधी संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या…

1 day ago