नाशिक

पारंपरिक चवीला नावीन्याचा साज

चांदीचा मोदक स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या ठरल्या भाग्यवान विजेत्या
या स्पर्धेेत प्रथम क्रमांक प्रीती नाथवाणी, द्वितीय- लीना दुसानेे, तर तृतीय क्रमांक वैशाली खातेले आणि उत्तेजनार्थ सुनीता खारकेले, गायत्री आहेर या विजेत्या चांदीच्या मोदकाच्या मानकरी ठरल्या.

नाशिक : प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या धामधुमीत मंगलमय वातावरणात दै. गांवकरी, मयूर अलंकार आणि सोनी गिफ्ट्स प्रा. लि. यांच्या विशेष सहकार्याने आयोजित चांदीचा मोदक जिंका स्पर्धा बुधवारी (दि. 23) दै. गांवकरी कार्यालयात झाली. या स्पर्धेला महिलांचा
उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाग्यवान पाच विजेत्या महिलांना चांदीचा मोदक बक्षीस स्वरूपात देण्यात आले.
यावेळी स्पर्धेच्या परीक्षक व अ‍ॅम्रो कॉलेजच्या प्राचार्या सुनंदा सोनी, दै. गांवकरीचे कार्यकारी संपादक सचिन अहिरराव, वृत्तसंपादक भागवत उदावंत, जाहिरात व्यवस्थापक अनिरुद्ध पांडे, मार्केटिंग मॅनेजर आनंद राईकर आदी उपस्थित होते.
मोदक स्पर्धेत शंभराहून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. उपसंपादक अश्विनी पांडे यांनी सूत्रसंचालन केले. या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी उपसंपादक मुकुंद बाविस्कर, गोरख काळे, देवयानी सोनार, राजेंद्र खुळे, वाहिद बागवान, निनाद राणे, सचिन बर्वे, नयना बारिया, गजानन वैद्य, व संदीप भांगरे यांनी परिश्रम घेतले.

मोदकाच्या विविध रेसिपी
कढीपत्ता-गाजर मोदक, दुधीपान शाही मोदक, आंब्याच्या कोयीचा शुगर फ्री मोदक, लापशी मोदक, मूषक मोदक, आयुर्वेदिक मोदक, मटार मोदक, मखाना आद्रक मोदक, बियांचा मोदक, पंचखाद्य मोदक, सातुपेय मोदक, मंजुळा बीट रूट मोदक, गाजर मोदक, रामकंद मोदक, शुगर फ्री मोदक, उकडीचा मोदक, पान मोदक, ओली हळद पंच औषधी मोदक, पौष्टिक खजूर मोदक, अवोकॅडो मोदक, रताळी ड्रायफ्रूट स्टफ मोदक, हळद-लिंबू-कढीपत्ता मोदक, ओरिओ बिस्कीट मोदक, पारंपरिक मोदक, कंदमूळ व पंचखाद्य पौष्टिक मोदक, मूगडाळ-भोपाळ पौष्टिक मोदक, केळीचा मोदक, ब्लॅक करंट मोदक, रोझ पनीर मोदक व घारगे मोदक.

गणेशोत्सव हा आनंदाचा काळ असतो. या कालावधीत बाप्पासाठी महिलांकडून विविध नैवेद्य तयार केला जातो. याच कालावधी दै. गांवकरीने मोदक स्पर्धा घेत महिलांच्या अंगी असलेल्या पाककलेला व्यासपीठ मिळवून दिले. मी पहिल्यांदा अशा
स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. पुढच्या वर्षी अजून चांगला मोदक बनविण्याचा प्रयत्न करेन. – समृद्धी बर्वेे, स्पर्धक

मोेदक स्पर्धा खूप छान पार पडली. दै. गांवकरीच्या वतीने महिलांसाठी अशा प्रकारच्या स्पर्धा कायम घेण्यात याव्यात. यातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळतो. महिलांमध्ये उपजतच कलागुण असतात. मात्र, त्यांना व्यासपीठ आवश्यक असते.
– कल्पना पवार, स्पर्धक

प्रत्येक स्पर्धक विजेता
स्पर्धा म्हटली की यशापयश आलेच. मात्र, स्पर्धेत सहभागी होणारा प्रत्येक स्पर्धक हा विजेता असतो. कारण त्या प्रत्येकाचे कष्ट व प्रयत्न सारखेच असतात. स्पर्धेतून नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळते व त्यातून आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना चालना मिळते. त्यामुळे कुणी स्पर्धेत यशस्वी झाले नाही म्हणून नाराज होऊ नये.
– सचिन अहिरराव, कार्यकारी संपादक, दै. गांवकरी

प्रत्येक मोदक नावीन्यपूर्ण
या मोदक स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांनी पारंपरिक मोदकांना नवनिर्मितीचा साज चढवत नावीन्यपूर्ण मोदक बनविले. विशेष म्हणजे, यंदाच्या स्पर्धेत सर्वच सहभागी महिलांच्या मोदक पाककृती या सारख्या नव्हत्या.प्रत्येकीने वेगळा काहीतरी प्रयत्न करत नवीन मोदक पाककृती तयार केली होती. सध्या इन्स्टा रील्सवरदेखील अनेक मोदक पाककृती व्हायरल होत आहेत. मात्र, कोणत्याही महिला स्पर्धकांनी त्या मोदक पाककृती न बनवता स्वतःच्या कल्पकतेला चालना देत नवीन मोदक बनविले. अशा स्पर्धांतून महिलांच्या कलागुणांना वाव मिळतो. दै. गांवकरी अशा स्पर्धांच्या माध्यमातून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देते, ही समाधाकारक बाब आहे.
– सुनंदा सोनी, प्राचार्या, अ‍ॅम्र्रो कॉलेज

उपक्रमांना प्रतिसाद ही पोचपावती
दै. गांवकरीच्या वतीने गेल्या पाच वषार्ंपासून मोदक स्पर्धा, पाककला स्पर्धा आणि नवरंगोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी गांवकरीच्या या स्पर्धात्मक उपक्रमांत महिलांचा सहभाग वाढता असतो. आमच्या उपक्रमांना मिळणारा महिला वाचकांचा प्रतिसाद हीच आमच्यासाठी पोचपावती आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांनी आपल्या घरी दै. गांवकरीचा अंक सुरू करत आमच्या विविध उपक्रमांशी कायम जोडलेले राहावे. – भागवत उदावंत, वृत्तसंपादक, दै. गांवकरी

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

लाल कांद्याच्या दरात 400 रुपयांची घसरण

लासलगाव : वार्ताहर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार (दि. 19) आणि शुक्रवार (दि. 20)…

23 hours ago

सगुण-निर्गुण एकचि पांडुरंग!

कार्तिकी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी…

24 hours ago

थेट विरोध

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरूच आहे. शरद पवारांच्या आजारपणात विलीनीकरणाची चर्चा…

24 hours ago

ड्रेनेज, पाणीपुरवठ्याच्या 370 कोटींच्या खर्चाला मंजुरी

सिंहस्थासाठी साधुग्राममध्ये पंधराशे एकरमध्ये काम होणार नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राममध्ये विविध…

1 day ago

इलेक्ट्रिक बससाठी स्वतंत्र पासची आवश्यकता नाही

अतिरिक्त भाडेही नाही; सिटीलिंकची माहिती नाशिक : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाशिकसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस…

1 day ago

स्वीकृतच्या दहा नगरसेवकांची अखेर नियुक्ती

महासभेत घोषणा; दुसरी जागा ठाकरे गटाने मिळवलीच नाशिक : प्रतिनिधी संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या…

1 day ago