नाशिक

‘राशप’तर्फे बागलाण तहसीलदारांना घेराव

शासनाचे आदेश धाब्यावर बसविले जात असल्याचा आरोप

सटाणा : तालुका प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊनही बागलाण तालुक्यात अद्याप पंचनाम्यांना सुरुवात झाली नाही. महसूल प्रशासनाकडून शासनाचे आदेश धाब्यावर बसविले जात असल्याचा आरोप करीत, तालुक्यात सरसकट पीक पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा, या मागणीसाठी बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांना घेराव घालून आंदोलन
करण्यात आले.
‘राशप’तर्फे महसूल प्रशासन तसेच शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत तहसील आवारात अचानक आंदोलन करण्यात आले. यानंतर तहसीलदारांना घेराव घालण्यात आला. यावेळी बोलताना माजी आमदार चव्हाण यांनी बोलताना, बागलाण तालुक्यात संपूर्ण पावसाळ्यात आतापर्यंत केवळ सुमारे चार ते पाच दिवस पाऊस पडला असून, पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने पिकांची वाढ खुंटल्याचे स्पष्ट करीत, कांदा, मका यांसह डाळिंब, द्राक्षे, सीताफळ, पेरू आणि ऊस या पिकांनाही मोठा फटका बसल्याचे सांगितले. उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकर्‍यांचे संपूर्ण आर्थिक नियोजन कोलमडले असून, शेतीवर अवलंबून असलेले मजूर, छोटे-मोठे व्यावसायिकही आर्थिक संकटात सापडले आहेत.
यावेळी केशव मांडवडे, संजय पवार, भारत काटके, छोटू सोनवणे, साहेबराव सोनवणे, अमित सोनवणे, दादू सोनवणे, पोपटराव सोनवणे, राजेंद्र जाधव, विनोद पाटील, मयूर अहिरे, विलास सोनवणे, किरण शिंदे, सागर मोरे, स्वप्नील सोनवणे, पोपटराव सोनवणे, विकी महाजन, पोपटराव अहिरे, सुभाष पाटील, काळु जाधव, दीपक रौंदळ, केदार सोनवणे, राजेंद्र सोनवणे, आनंदा सोनवणे आदींसह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. संकटग्रस्त शेतकर्‍यांना पीकविमा योजनेची रक्कम तातडीने वितरित करावी, पिकांचे सरसकट पंचनामे करून शासनाला तत्काळ अहवाल पाठवावा तसेच बागलाणमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची दखल घेऊन त्याअंतर्गत मिळणारे सर्व लाभ शेतकर्‍यांना द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Baglan Tehsildars surrounded by ‘Rashap’

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

7 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

7 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

7 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

7 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago