वाहतूक काही काळ विस्कळीत; सुदैवाने जीवितहानी टळली
सिडको : प्रतिनिधी
उंटवाडीतील सिटी सेंटर मॉल परिसरात अवजड कंटेनरची धडक लागल्याने महाकाय, अतिप्राचीन आणि हेरिटेज दर्जा प्राप्त वटवृक्षाची मोठी फांदी रस्त्यावर कोसळल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नंदिनी नदीकाठावरील प्राचीन म्हसोबा महाराज मंदिराजवळ हा प्रकार घडला.
मध्यरात्रीच्या सुमारास एक अवजड कंटेनर या मार्गावरून जात असताना त्याचा वटवृक्षाच्या रस्त्याच्या दिशेने असलेल्या फांद्यांना धक्का लागला. त्यानंतर फांदीचा मोठा भाग तुटून थेट रस्त्याच्या मध्यभागी कोसळला. त्यामुळे सिटी सेंटर मॉल चौकातून सिडको, त्रिमूर्ती चौक आणि उंटवाडीच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. वाहनांची कोंडी होऊन वाहतूक संथगतीने सुरू होती.
घटनेची माहिती मिळताच नगरसेविका कविता नाईक आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल नाईक यांनी पहाटे घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यांनी महापालिका प्रशासनाला माहिती देऊन तातडीने फांदी हटविण्याची मागणी केली. त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आवश्यक साधनांच्या मदतीने फांदी हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. फांदी हटविण्याच्या वेळी म्हसोबा महाराज मंदिर ट्रस्टचे पदाधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते. तातडीने कार्यवाही करून वाहतूक सुरळीत केल्याबद्दल स्थानिक नागरिक आणि मंदिर ट्रस्टच्या सदस्यांनी महापालिका प्रशासन, अग्निशमन दल तसेच मदत करणार्या पदाधिकार्यांचे
आभार मानले.
Banyan tree branch falls onto the road after being hit by a heavy container truck.
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…