नाशिक

वीजवाहिनीच्या संपर्कात आल्याने कामगाराचा मृत्यू

सिडको : प्रतिनिधी
घरातील फरशी बसविताना लोखंडी पाइपचा वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने विजेचा जोरदार धक्का बसून 28 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी कारगिल चौक, दत्तनगर, चुंचाळे परिसरात घडली. याप्रकरणी अंबड एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रेमकुमार चंद्रदीप पंडित (वय 28, रा. कामगारनगर, सातपूर) असे मृत कामगाराचे नाव आहे. प्रेमकुमार हे त्यांचे भाऊ संजित यांच्यासोबत चुंचाळे परिसरातील खोली क्रमांक दोनमध्ये फरशी बसविण्याचे काम करीत होते. काम सुरू असताना त्यांच्या हातातील लोखंडी पाइपचा जवळून जाणार्‍या वीजवाहिनीला अचानक स्पर्श झाला. त्यामुळे प्रेमकुमार यांना विजेचा जोरदार धक्का बसून ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर भाऊ संजित आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अंबड एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस हवालदार चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

Worker dies after coming into contact with power line.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

भुजबळ- जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली

आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…

3 minutes ago

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

21 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

21 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

21 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago