नाशिक

मंत्री भुसेंच्या कार्यालयावर 5 एप्रिलला भीक मांगो आंदोलन

नांदगावला आधारवड सेवाभावी संस्थेच्या बैठकीत निर्णय

नांदगाव : प्रतिनिधी
येथील आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची बैठक संस्थापक अध्यक्षा संगीता सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाली. बैठकीत जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम झाला. आगामी काळात शालेय पोषण आहार शिजवणार्‍या महिलांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र लढा उभारण्याचा निर्धार केला. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील कार्यालयावर येत्या 5 एप्रिलला भीक मांगो आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
बैठकीत शालेय पोषण आहार शिजवणार्‍या महिलांना होणार्‍या अडचणीँसंदर्भात चर्चा केली. राज्य सरकारने शासकीय आश्वासनाची पायमल्ली केली आहे. एक हजार रुपयांच्या वाढीची अंमलबजावणी रखडली आहे. यामुळे या बैठकीत महिलांनी सरकारप्रति तीव्र संताप व्यक्त केला. तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी शालेय पोषण आहार शिजवणार्‍या महिलांच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ जाहीर केली होती. मात्र, विद्यमान सरकारने अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. महिलांना त्यांच्या हक्काच्या मानधनापासून वंचित ठेवल्याने प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला आहे. बैठकीला सचिव आशाबाई काकळीज, मनीषा भाबड, शैला भाबड, सुमित्रा शिंदे, सरला मोढे, कविता मोरे, मंगल देसले, संगीता गुंजाळ, कुसुम मगर, सरूबाई दळवी यांच्यासह आधारवड संस्थेच्या पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील कार्यालयावर येत्या 5 एप्रिलला भीक मांगो आंदोलन करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या हक्कासाठी महिलांना रस्त्यावर उतरून शासनाचे लक्ष वेधून घ्यावे लागणार आहे आणि जमा झालेले पैसे आम्ही सरकारला मनिऑर्डर करू.
– संगीता सोनवणे, अध्यक्षा, आधारवड सेवाभावी संस्था, नांदगाव

Begging protest at Minister Bhuse’s office on April 5

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

3 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

4 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

4 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

4 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

4 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

4 days ago