सिडको : विशेष प्रतिनिधी
जयभवानी रोड परिसरात कोयत्याने हल्ला करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी फरार झालेल्या विजय उर्फ छंगा बेहनवाल आणि त्याच्या साथीदारांना गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील एका कला केंद्रातून अटक केली. सिन्नरमध्ये धाड टाकल्यानंतर आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले होते. मात्र, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्यांचा माग काढत पोलिसांनी ही कारवाई केली.
उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयभवानी रोड येथे 20 जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास जुन्या वादातून पाच ते सहा जणांनी फिर्यादीच्या भावावर कोयत्याने हल्ला केला. तसेच घरावरही कोयत्याने वार करून सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांचे प्रदर्शन करत परिसरात दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी 21 जुलै रोजी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान विजय उर्फ छंगा बेहनवाल आणि त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्यांचा शोध सुरू केला.
आरोपी सिन्नर परिसरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाड टाकली. मात्र, पोलिसांचा सुगावा लागताच आरोपी पांढर्या रंगाच्या चारचाकी वाहनातून पुण्याच्या दिशेने पसार झाले. सिन्नरमधील दोन कला केंद्रांवरही छापे टाकण्यात आले, मात्र आरोपी तेथूनही निसटले. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील एका कला केंद्रात लपल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कला केंद्राला चहुबाजूंनी वेढा घालून विजय उर्फ छंगा सरजित बेहनवाल (वय 28), योगेश उर्फ स्पर्श भगवान शहारे (वय 42), प्रदीप उर्फ गणेश विठ्ठल काळे (वय 26) आणि सचिन उर्फ अन्नू राधेकिशन गवंडर (वय 32) या चौघांना ताब्यात घेतले.
तपासात आणखी एक बाब समोर आली. सिन्नरहून पुण्याच्या दिशेने जात असताना आरोपी संगमनेर येथील एका बारमध्ये गेले. तेथे स्वतःला नाशिकचे भाई म्हणवत त्यांनी बार मालकाकडे मोफत दारूची मागणी केली. नकार मिळाल्यानंतर दमदाटी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नोंदीनुसार आरोपींवर नाशिकरोड आणि उपनगर पोलीस ठाण्यात तोडफोड, मारामारी, दहशत निर्माण करणे यांसारखे 10 ते 12 गंभीर गुन्हे दाखल आहेत. फर्नांडिसवाडी परिसरातील बेरोजगार तरुणांना हाताशी धरून ही टोळी कार्यरत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, या कारवाईमुळे नाशिकरोड आणि उपनगर परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. गुंडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली.
Behanwal gang, which had escaped from Sinnar, arrested in Narayangaon.
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…