दीपावली पर्वात गर्दी टाळण्यासाठी निर्णय
वणी, सप्तशृंगगड : प्रतिनिधी
सप्तशृंगी निवासिनी देवीचे दर्शन भाविकांना रात्री बारापर्यंत घेता येणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळांनी दिली. खानदेशचे माहेरघर असलेल्या सप्तशृंगी निवासिनी देवीच्या दर्शनासाठी दीपावली पर्वात भाविक मोठ्या संख्येने येतात. याअनुषंगाने 22 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरदरम्यान पहाटे 5 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दीपोत्सवादरम्यान राज्यासह परराज्यातील विविध शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असते, तसेच दरवर्षी दिवाळीत दर्शनासाठी येणार्या पायी पालख्या व नवरात्रोत्सवातील गर्दीच्या परिस्थितीमुळे श्री भगवती दर्शनासाठी येऊ न शकलेला भाविकांच्या संभाव्य गर्दीची परिस्थिती टाळण्याच्या हेतूने श्री भगवती मंदिर दैनंदिन स्वरूपात पहाटे 5 ते रात्री 12 दरम्यान दर्शनासाठी सुरू ठेवल्यास गर्दीची योग्य ती विभागणी, तसेच भक्तनिवास, सुरक्षा व इतर बाबींवर पडणारा ताण विभागून भाविकांना श्री भगवती दर्शनासह इतर सुविधांचा विशेष लाभ घेता येईल.
यादृष्टीने विश्वस्त मंडळाने हे नियोजन केले आहे. दरम्यान, आवश्यतेनुसार श्री भगवती मंदिरातील पर्यवेक्षक, सेवेकरी, सुरक्षारक्षक, मदतनीस तसेच देणगी कार्यालय येथील कर्मचारी आदींसह आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता, रोपवे ट्रॉली सुविधादेखील दैनंदिन स्वरूपात भाविकांना उपलब्ध असेल, असे नियोजन केले आहे. गर्दीचा कालावधी टाळून पर्यायी दर्शन सुविधेच्या उपलब्ध वेळेचा विचार करता निर्धारित वेळेत श्री देवी दर्शनासाठी येऊन मंदिर व्यवस्थापनास योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन विश्वस्त संस्थेनेे केले आहे.
शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू सिडको : दिलीपराज सोनार जुने सिडको परिसरातील शॉपिंग…
लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला स्थगिती लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मुंबई: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा…
राधाकृष्णनगरमध्ये परप्रातीय स्वयंघोषित भाईचा राडा गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत दहशत सातपूर : सातपूर…
जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना दाखल करण्यास नकार — छावा क्रांतीवीर सेनेकडून रुग्णालय प्रशासनाचा तीव्र निषेध!…
सिडको : विशेष प्रतिनिधी वृद्धेच्या घरी जाऊन चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून…
जमीन खंडणी प्रकरणी सातपुर पोलिसात गुन्हा सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर परिसरात खंडणी व…