भारत स्वातंत्र्यापासूनच जगाच्या विविध घटकांचे नेतृत्व करत आहे स्वातंत्र्याच्या वेळी स्वतःसारख्या वसाहतवादाचे शिकार असणार्या देशांचे नेर्तृत्व भारताने केले वसाहतवादी राष्ट्रांकडून शोषण झाल्याने सर्वस्व गमावलेलया राष्ट्रांचे अजून नुकसान न होता त्यांना उपलब्द असणार्या साधनसंपदेत त्यांच्या झपाट्याने विकास व्हावा यासाठी भारताने नमाच्या झेंड्याखाली या नवस्वातंत्र्य मिळविलेल्या देशांची संघटन उभारून जागतिक राजकारणात त्यांच्या अजून फुटबॉल होणार नाही याबबाबत काळजी घेतली जगात सर्वात जास्त शांतीसेना पाठवण्याचा विक्रम सुद्धा भारताच्या नावावर आहे संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत (णछॠA ) अनेक आफ्रिकी देशांचे लक्ष भारत एखाद्या विषयावर काय भूमिका घेतो याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष असण्याच्या काळ फारसा जुना नाही त्याकाळी भारताच्या प्रतिनिधीने एखाद्या मतदानाच्या वेळी हात वॉर केल्यावर अनेक आफ्रिकी देशाच्या प्रतिनिधींचे हात वरती येत असत भारताचे मत म्हणजे निवळ स्व हित नव्हे तर स्वहिता बरोबर जगाचे देखील कल्याण असणार अशी खात्री असायची याच गौरवशाली इतिहासाच्या वारश्यावर भारत आता पहिल्या जगाबरोबर ताठ मानेने डोळ्याला डोळा लावत बोलणी करत आहे
म्हणूनच भारताने रशिया आणि युक्रेन वादामध्ये अमेरिकेला साह्य होईल अशी भूमिका घेतली नाही. रशियाकडून नैसर्गिक इंधने घेणे भारताने सुरूच ठेवले असले तरी अमेरिकेने पूर्व नियोजित असणारी भारताबरोबर 2 +2 वार्ता रद्द न करता तिचे वॉशिंग्टन डिस्ट्रिक कोलंबिया या आपल्या केंद्रीय राजधानीच्या शहारत यशस्वी आयोजन नुकतेच केले या वार्ता परिषदेला भारताकडून भारताचे सरंक्षण मंत्री राजनाथसिंग आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी तर अमेरिकेकडून अमेरिकी सेक्रेटरी ऑफ स्टेट (आपल्या परराष्ट्रमंत्री समकक्ष ) अँटनी ब्लिंकेंन आणि अमेरिके सेक्रेटरी ऑफ डिफेन्स (आपल्या परराष्ट्र मंत्री समकक्ष ) लॉयड ऑस्टिन यांनी प्रतिनिधित्व केले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन बायडन यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यवरची ही पहिलीच या प्रकारची चर्चा होती या आधी भारताच्या अमेरिकेबरोबर तीनदा अश्या स्वरूपाच्या बैठका झालेल्या आहेत ही बैठक चौथी होती भारत अश्या प्रकारच्या 2+2 प्रकारच्या चर्चा अमेरिका सोडून फक्त जपान रशिया आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांबरोबरच करतो सध्या भारताच्या रशियाच्या बाजूच्या काहिस्या भूमिकेमुळे पूर्व नियोजित ही चर्चा होते का ? याबाबतबराच संभ्रम होता मात्र अमेरिकेकडून सकरात्मक प्रतिसाद आल्याने ही बैठक यशस्वी होऊ शकली या बैठकीच्या आधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉन बायडेन यांनी ऑनलाईन संवाद साधल्याने प्रत्यक्ष चर्चा होताना फायदा झाल्याचे जाणकारांचे मत आहे
बैठकीच्या वेळी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा जॅक सुलिवान आणि भारताचे अमेरिकेतील राजदूत तरनजीत सिंह संधू हेही यावेळी उपस्थित होते अमेरिकेचे जॅक सुलिवान आपल्या भारताच्या अजित डोवाल यांच्या समकक्ष आहेत यावेळी दोन्ही देशांमध्ये रशिया युक्रेन यांच्यातील युद्ध आणि कोव्हीड 19 नंतर उद्भवलेल्या विविध जागतिक स्वरूपाच्या आर्थिक आणि सामाजिक स्वरूपाच्या स,समस्येवर विचारमंथन झाले यावेळी भारताच्या अवकाश संशोधन संस्था आणि अमेरिकेच्या सरंक्षण दलादरम्यान करार करण्यात आले ज्याद्वारे स्पेस वॉर बाबत एकमेकांना साह्य करण्यात येणार आहे ज्यामध्ये अमेरिकेपेक्षा आपल्या भारताचा अधिक फायदा आहे भारताच्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी देखील यावर काही करार करण्यात आले या बैठकीच्या वेळी रशियाकडून युक्रेनमध्ये करण्यात आलेलय हत्याकांडाचा निषेध घेण्यात आला भारताने रशियाच्या हत्याकांडाच्या केलेला निषेध ही गोष्ट अमेरिकेला सुखावणारी होती अमेरिकेच्या प्रशासनातील अनेक उचपदस्थांना भारताने रशियाबरोबर सर्व संबंध तोडावे अशे मत उघडपणे व्यक्त केले आहे हे आपण लक्षात घेयला हवे
अमेरिकेने भारत रशियाकडून घेत असलेल्या नैसर्गिक इंधने विकत घेण्याबरोबर भारतातील मानवी हक्काचे उल्लंघन होण्याच्या मूढयवर छेडले असता या दोन्ही मुद्यांवर परराष्ट्र मंत्री एस ज्यांशंकर यांनी दिलेले ऊत्तर भारताच्या परराष्ट्र धोरणातील कणखर पणा दाखवणरे होते त्यांनी भारत त्यांचा एकूण गरजेपैकी फारच कमी नैसर्गिक इंधन रशियाकडून घेतो तुम्ही जेव्हडे एका दिवसात घेतात त्यांच्या पेक्षा कमी नैसर्गिक इंधन आम्ही एका महिन्यात घेतो आम्ह्लाही अमेरिकेकडून होत असलेल्या मानवी हक्काच्या बाबतीत चिंता वाटते असे बाणेदार ऊत्तर त्यांनी यावेळी दिले यावेळी दोन्ही देशात अधिक लष्करी आणि नाविक कवायती करण्यावर देखील चर्चा करण्यात आली यावेळी सायबर क्राईम तसेच इंडो पॅसीफीक क्षेत्राच्या सुरक्षेबाबत काय करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली त्या क्षेत्रातील चीनच्या प्रभावाबाबत देखील चर्चा करण्यात आली भारताच्या समुद्री किनार्यापासून इंडो चायना क्षेत्रातील देश (आग्नेय आशिया भागातील देश ) ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक क्षेत्रातील देशांना इंडो पॅसीफीक क्षेत्रातील देश म्हणतात यामध्ये जपान फिलिपिन्स दक्षिण कोरिया न्यूझीलंड , यासह अनेक छोट्या छोट्या देशांचा समावेश होतो पूर्वी जगाचे राजकारण अमेरिका आणि युरोप खंडामध्ये विभागले होते आता मात्र या क्षेत्रांकडे झुकले आहे यातील महत्त्वाचं देश म्हणून संपूर्ण जग भारताकडे बघते या भागतील भारतासह महत्त्वाचा देश म्हणून चीन ओळखला जातो
एकंदरीत हि चर्चा भारतातही फायदेशीर ठरली असेच म्हणावे लागेल.
अजिंक्य तरटे
9423515400