अपघातग्रस्त युवतीच्या मदतीला भुजबळ धावले
नाशिक : प्रतिनिधी
शहापूर येथे बिऱ्हाड मोर्चा थांबलेला आहे. त्यामुळे एकाच रस्त्यावरून दोनही बाजूची वाहतूक सुरू आहे. यादरम्यान आज दुचाकीस्वार युवतीचा भीषण अपघात झाला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे आज नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असतांना अपघातग्रस्त ठिकाणी थांबून त्यांनी अपघातग्रस्त युवतीला मदत केली. यावेळी छगन भुजबळ यांच्या सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त युवतीला मुख्य रस्त्यावरून तातडीने बाजूला केले. यावेळी बिऱ्हाड मोर्चाच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांना तातडीने बोलवून अपघातग्रस्त युवतीवर प्राथमिक उपचार करून तिला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…