उत्तर महाराष्ट्र

प्रशासनाचा अलर्ट: जिल्हयात उद्या ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता

प्रशासनाचा अलर्ट: जिल्हयात उद्या ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद

नाशिक: भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने श्री त्र्यंबकेश्वर मंदिर मंगळवार, ७ जुलै रोजी संपूर्ण दिवस दर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
मंदिरातील नित्यपूजा व धार्मिक विधी नेहमीप्रमाणे पार पडतील. मात्र, भाविकांना मंदिरात प्रवेश व दर्शनाची परवानगी दिली जाणार नाही.
भाविकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन सहकार्य करावे व अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
बुधवार, ८ जुलै रोजी सकाळी ९ वाजल्यापासून श्री त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे.
.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

15 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

15 hours ago