प्रभाग एकमध्ये खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची बाइक रॅली

मनपा निवडणुकीतही शिवसेनेचा स्ट्राइक रेट सर्वाधिक राहणार : खा. डॉ. शिंदे

पंचवटी : प्रतिनिधी
पंचवटीतील म्हसरूळ व परिसरात प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना पक्षाचे (शिंदे गट) उमेदवारांच्या प्रचारार्थ युवानेते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची बाइक रॅली बुधवारी (दि. 7) काढण्यात आली. नाशिकमध्ये शिवसेनेत वातावरण पाहायला मिळत आहे. नाशिक महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल. शिवसेनेचा महापौर होईल, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.
उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (1-अ), गणेश चिंतामण चव्हाण (1-ब), उर्मिला सुनील निरगुडे (1-क), प्रवीण मंदाकिनी रमेश जाधव (1-ड) यांच्या प्रचारार्थ ही रॅली होती. राजमाता माता मंगल कार्यालय येथून रॅलीस शुभारंभ करण्यात आला. शुभम पार्क, कलानगर, पाटील लेन, म्हसरूळ, किशोर सूर्यवंशी मार्ग आदी परिसरातून कन्सारा माता चौकमार्गे राऊ हॉटेल येथे या रॅलीचा समारोप झाला.
यावेळी मंत्री दादा भुसे, नांदगावचे आमदार सुहास कांदे, माजी खासदार हेमंत गोडसे, तसेच प्रभाग क्रमांक शिवसेनेचे (शिंदे गट) अधिकृत उमेदवार प्रवीण रमेश जाधव, नयना रवींद्र रामवंशी, गणेश चिंतामण चव्हाण, उर्मिला सुनील निरगुडे यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते.
नाशिकमध्ये शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित रॅली पंचवटीतील श्री काळाराम मंदिर येथून सुरू झाली. या रॅलीपूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत भाऊसाहेब चौधरी, हेमंत गोडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख व उपनेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे व कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, नाशिक महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल. याआधीदेखील 35 नगरसेवक निवडून आले होते. आता आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आता आणखी यश मिळेल. आम्ही आकड्यांच्या गणितात जात नाही. शिवसेनेचा महापौर होईल. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत पाहायला मिळाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात जास्त काम झाले आहे. जास्त निधी महाराष्ट्राला मिळाला. नवीन योजना आणण्याचे काम झाले. नाशिकला निधी आणण्याचे काम केले. कुंभमेळा येतोय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तयारी करत आहेत. नगरविकास खात्याच्या माध्यमातून विकास होईल. नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा स्ट्राइक रेट चांगला राहिला आहे. आताही स्ट्राइक रेट चांगला राहील. 64 ठिकाणी नगराध्यक्ष झाले आहेत.
बंडखोरांविषयी शिंदे म्हणाले की, बंडखोरीचा मला प्रॉब्लेम वाटत नाही. नगरपालिकेला होते. स्ट्राइक रेटला 135 पैकी 64 जागी नगराध्यक्ष राहिले. तपोवनाबाबत ते म्हणाले की, तपोवन वाचवायचेे आहे. शिवसेना नाशिकबरोबर आहे. आमचा पाठिंबा आहे. पर्यायी मार्ग काढला पाहिजे.

Bike rally of Dr. Shrikant Shinde in Ward One

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

19 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago