नाशिक

नाशकातील इच्छुक उमेदवारांचा असाही पवित्रा

एकाने तोंड झोडून घेतले, दुसरा उपोषणाला बसला

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी भारतीय जनता पार्टीमध्ये मोठी चुरस पाहावयास मिळाली. एबी फॉर्मसाठी मोठा राडा झाला. विल्होळी येथील एका फार्महाउसमध्ये इच्छुक उमेदवार आणि भाजपाचे आमदार यांच्यात एबी फॉर्मसाठी मोठे घमासान पाहावयास मिळाले.
प्रवेशद्वार तोडून कार्यकर्ते आतमध्ये शिरले. भाजपने उमेदवारी देताना अनेक इच्छुकांना शब्द दिला होता. मात्र, एक हजाराहून अधिक इच्छुक आणि जागा फक्त 122. त्यामुळे भाजप नेतृत्वालाही सरमिसळ करताना चांगलीच दमछाक सहन करावी लागली. वर्षानुवर्षे पक्षाचे कार्य करूनही अनेकांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांवर संताप व्यक्त केला. शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. त्यात काहींनी आपापल्या समर्थकांची वर्णी लावून घेतली; परंतु ज्या मंडळींच्या मागे कुणी नाही, अशांना तिकिटासाठी संघर्ष करावा लागला. काहींना पक्षाने शब्द देऊनही तिकीट दिले नाही. त्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला. सिडकोतील प्रभाग क्रमांक 29 मधील एका उमेदवाराने रात्रंदिवस प्रचार केला. भाजपच्या दिव्यांग आघाडीचे काम करताना इतरांच्या मदतीने का होईना, पण वेगवेगळे कार्यक्रम केले. अनेकांना वेगवेगळे पुरस्कार दिले. पण पक्षाने ऐनवेळी उमेदवारी न दिल्याने त्यांचा संताप अतिशय अनावर झाला. या संतापात त्यांनी स्वत:चे तोंड झोडून घेत संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, दोघे पती-पत्नी उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, पक्षाने दोघांनाही ऐनवेळी ठेंगा दिला. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्याने या उमेदवाराने भररस्त्यात संताप व्यक्त करत तोंड झोडून घेतले. आमदार सीमा हिरे आणि भाजप यांच्या विरोधात घोेषणाबाजीही केली. भारतीय जनता पार्टीने अनेक आयात उमेदवारांना यावेळी उमेदवारीचे वाटप केले. हे करताना स्वपक्षातील अनेक निष्ठावानांना डावलल्याने कार्यकर्त्यांनी सतरंज्याच उचलायच्या का? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला.

शिवसेना उबाठा कार्यालयासमोर एकाचे उपोषण

भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुकांची नाराजी उफाळून आली असताना शिवसेना उबाठा गटातही काही निष्ठावानांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनीही पक्षाच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला. राकेश साळुंखे नामक एक कार्यकर्ता उमेदवारी न मिळाल्याने शालिमार येथील पक्ष कार्यालयासमोर काल सकाळी उपोषणाला बसला होता. मात्र, नंतर त्याला कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने या ठिकाणाहून काढून दिले.

This is also the attitude of the aspiring candidates in Nashik.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

5 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

5 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

5 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

5 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

5 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

5 hours ago