नाशिक

भाजपाच्या विजय चौधरींनी घेतली धनंजय बेळे यांची भेट

नाशिक : प्रतिनिधी
भाजपाचे प्रदेश महामंत्री तथा नाशिक विभागाचे संघटन सचिव विजयराव चौधरी यांनी  काल शुक्रवार (दि.२)रोजी निमा कार्यालयात  जात निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांची भेट घेतली.  या भेटीवेळी चौधरी यांनी   बेळे यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याची माहिती जाणून घेत झालेला प्रकार दुर्देवी असुन अशा घटना व्हायला नकोत असे मत  व्यक्त केले .  तसेच बेळे यांनी घेतलेल्या सामंजस्याच्या भुमिकेचे कौतूक केले.तर
उद्योग बंदचा निर्णय   मागे घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी चौधरी म्हणाले,  आम्ही गुन्हेगारांना कधीही पाठीशी घालणार नाही. येत्या काळात  सुकाणू समिती, निमा पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन  झालेल्या प्रकार पुन्हा होणार नाही यासाठी  प्रयत्न करू असे सांगितले,
याप्रसंगी उपस्थित निमा पदाधिकारी व सदस्यांनी झालेल्या सर्व घटनेचा तपशील चौधरी यांना  सांगितला.
नाशिक जिल्ह्याचे प्रभारी  राजेंद्र गावित तसेच सहसचिव श्री भोळे,  श्री बच्छाव , निखिल पवार ,प्रशांत जाधव आदी भाजपाचे  पदाधिकारी व निमाचे  राजेंद्र वडनेरे,  विजय जोशी, कैलास पाटील, विराज गडकरी, आदींसह पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

कारवाईचा धडाका, मग इतकी वर्षे दुर्लक्ष का?

- अश्विनी पांडे शहरातील हॉटेल्समध्ये अस्वच्छता, भेसळयुक्त व दर्जाहीन अन्नपदार्थांची विक्री, तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन…

7 hours ago

बारा कोटींची क्लीन चिट

- गोरख काळे बारा कोटींचा हिशेब मागताना सभागृह डोक्यावर घेणारे स्थायी समितीचे सदस्य अचानक शांत…

7 hours ago

साप्ताहिक राशिभविष्य

दि. 22 ते 28 नोव्हेंबर 2026 मेष : यश मिळेल हा आठवडा नवीन विचार, सकारात्मक…

7 hours ago

जलसंधारण चळवळीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा

पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन आहे. मानवी जीवनापासून शेती, उद्योग आणि पर्यावरणाच्या संतुलनापर्यंत प्रत्येक गोष्ट…

8 hours ago

नवचैतन्य

भाजपाची सत्ता असलेल्या राजस्थानातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांत जोरदार मुसंडी मारणार्‍या काँग्रेसमध्ये नवचैतन्य…

8 hours ago

रस्ता झाला खोल, चेंबरचा झोल

गंगापूर रोडवर वाहने चालवणार्‍यांची पंचाईत नाशिक : प्रतिनिधी आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांचे रूप पालटत…

8 hours ago