येवला :प्रतिनिधी
वीर जवान अजित शेळके यांच्यावर मानाेरी येथे शासकिय इतमामात अंत्यसंस्कार, येवला प्रतिनिधी राजस्थान येथे सेवेत असणारे जवान अजित शेळके यांचा अपघाती मृत्यू झाला हाेता आज येवला तालुक्यातील मानाेरी येथे त्यांच्या गांवी शहीद वीर जवान यांच्या पार्थिवावर शाेकाकुळ आणि शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले सकाळी ९ वाजेच्या दरम्यान फुलांनी सजवलेल्या गाडीतून त्यांचे पार्थिव स्मशान भुमिकडे नेण्यात आले वीर जवान अजित शेळके अमर रहे अशी घाेषणा देण्यात आली शेळके परिवाराच्या वतीने वीर जवान अजित शेळके यांच्या पार्थिवावर फुले वाहण्यात आली परिवारातील पत्नी, आई, वडील, भाऊ, तसेच नातेवाईकांनी आपला शाेक व्यक्त करून जवान अजित शेळके यांना अभिवादन केले तसेच तहसीलदार प्रमाेद हिले, ५४ अरमाड बटालियनच्या वतीने वीर जवान शेळके यांच्या पार्थिवावर फुले वाहण्यात येऊन अभिवादन करण्यात आले शाेकाकुळ वातावरणात वीर जवान अजित शेळके यांच्या पार्थिवावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रसंगी शिवसेनेचे नेते संभाजी पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर पाेलिस निरीक्षक पांडुरंग पवार, बाळासाहेब लाेखंडे, आदीसह नागरीक उपस्थित होते.