संतापजनक ! बसमध्ये कोंबले 150 विद्यार्थी

नाशिक वाडीवऱ्हे बसमधुन विद्यार्थी करताय जीवघेणा प्रवास

नाशिक : वार्ताहर
चार दिवसांपुर्वीच औरंगाबादरोडवरील मिर्ची हॉटेलजवळ घडलेली बस दुर्घटनेची घटना ताजी असतांनाच जुन्या सीबीएस मधुन वाडीवऱ्हेकडे जाणाऱ्या बससंबंधी एक भयावह असा चीड आणणारा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
जुन्या सीबीएस येथुन दररोज दुपारी 3 च्या सुमारास नाशिककडून वाडीवऱ्हे येथे जाण्यासाठी बस सुटते. काल दुपारी या पंचवटी डेपोच्या बस (क्रमांक एमएच 14 बीटी 4509) मध्ये  सुमारे दीडशे शालेय विद्यार्थी कोंबुन भरलेले दिसुन आले.  शाळा, कॉलेज सुटल्यानंतर घराकडे जाण्यासाठी सुमारे 150 विद्यार्थी एकाच बसमध्ये मुठीत जीव घेऊन जीवघेणा प्रवास दररोज करतात. या विद्यार्थ्यांच्या जीवाला हानी पोहोचल्यास अथवा बससोबत काही अघटीत घडल्यास जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या 8 दिवसांत जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी बसेसला आगी लागल्याच्या घटना घडल्या. औरंगाबादरोडवरील मिर्ची हॉटेलजवळ बसचा अपघात ताजा असतांनाच काल पुण्याजवळ बसला आग लागली यात सुमारे 27 प्रवाशी बालंबाल बचावले. या घटना ताज्या असतांनाच, बसमध्ये सीटची संख्या 55 असतांनाच अशाप्रकारे सुमारे 150 विद्यार्थ्यांना कोंबणे कितपत व्यवहार्य आहे याचा विचार होणे गरजेचे आहे.
यासंबंधी आमच्या वार्ताहरांनी अधिक तपास केला असता समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. नाशिक वाडीवऱ्हेसाठी वाडीवऱ्हे डेपोतुन दर तासाला नाशिककडे बस सुटते.  दिवसभरात अशा सुमारे 12 तासात 12 बसेस सुटतात. मात्र त्या केवळ कागदोपत्रीच. यासंबंधी तथ्ये तपासली असता साधारण: अडीच ते तीन तासांनी वाडीवऱ्हे येथुन नाशिकला 1 बस येते अशी माहिती समोर आली.
वाडीवऱ्हे येथुन सकाळी सुटलेली बस बारा ते साडेबारा दरम्यान नाशिकला पोहोचते त्यानंतर अडीच ते तीनच्या सुमारास दुसरी बस नाशिकला पोहोचते. सकाळच्या सत्रातील शाळा, कॉलेज करुन घरी जाण्यासाठी सुमारे 150 ते 200 विद्यार्थी सीबीएस बस स्टॅण्डवर ताटकळत उभे असतात. अडीच ते तीनच्य सुमारास वाडीवऱ्हे येथे जाण्यासाठी केवळ एकच बस सुटत असल्याने याच बसमध्ये सुमारे 150 विद्यार्थी अतिशय दाटीवाटीने शेळ्यामेंढऱ्यांप्रमाणे कोंबुन या बसमधुन प्रवास करतात.
यासंबंधी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जाग येणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणे अतिशय धोकादायक आहे. एखादा अपघात घडून कुणाचा जीव गेल्यावरच महामंडळाला जाग येणार का असा प्रश्न विद्यार्थ्यांसह प्रवाशी विचारत आहे.

वाडीवऱ्हे आगारातून नाशिकसाठी दर तासाला एक बस सुटते मात्र ती कागदोपत्रीच. प्रत्यक्षात दर तीन तासाला एक बस नाशिकला पोहोचते. या समस्येचे मुळ कारण बसच्या संख्येत आहे. वाडीवऱ्हे आगाराकडे असलेल्या बसची संख्या प्रत्यक्षात कमी आहे. विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी वेळप्रसंगी नाशिक आगारवाले पंचवटी डेपोच्या बसेस वाडीवऱ्हेला जाण्यासाठी उपलब्ध करुन देतात. केवळ एक बस असल्याने विद्यार्थी घरी जाण्यासाठी याच बसमध्ये गर्दी करतात. त्यामुळे सुमारे 150 विद्यार्थी एकाच बसमधुन प्रवास करतात. दुर्देवाने काही अघटीत घडल्यास कुणाला दोष देणार असा संतापजनक सवाल प्रवाशी विचारत आहेत.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

12 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

12 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

12 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

12 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago