नाशिक

पाच वर्षांच्या मुलीच्या अपहरणप्रकरणी अखेर पित्याविरुद्ध गुन्हा

धारदार शस्त्र दाखवून तक्रारदार व तिच्या वहिनीला धक्काबुक्की केल्याचाही आरोप

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
घरगुती वादातून माहेरी आलेल्या महिलेच्या पाचवर्षीय मुलीला तिच्या संमतीशिवाय घेऊन गेल्याप्रकरणी पित्याविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सूरज चैहान याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला गेल्या महिन्यापासून आई-वडिलांसह प्रेमराज सोसायटी, दत्तमंदिर रोड येथे राहत होती. पतीसोबत घरगुती कारणांवरून वारंवार वाद होत असल्याने ती 29 ऑगस्ट रोजी दोन्ही मुलांसह माहेरी आली होती.
1 ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास सात ते आठ जण तक्रारदार महिलेच्या माहेरी आले. त्यांनी घरात घुसून शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच धारदार शस्त्र दाखवून तक्रारदार व तिच्या वहिनीला धक्काबुक्की केल्याचेही नमूद आहे.
या टोळक्याने महिलेची पाचवर्षीय मुलीला जबरदस्तीने ताब्यात घेतले. दहावर्षीय मुलाला घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र, आरडाओरड झाल्यानंतर नागरिक जमा झाल्याने आईने मुलाला परत घेतले. दरम्यान, मुलीला एका चारचाकी वाहनातून घेऊन संशयित पसार झाले. नागरिकांनी सूरज चैहान याला पकडून ठेवले. महिलेच्या भावाने 112 वर संपर्क साधल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पती जिगर भरतभाई शहा (सिल्वासा, दादरा-नगर हवेली) यांच्या सांगण्यावरून हा प्रकार घडल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच पतीकडून कुटुंबाला धमक्या मिळत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
याप्रकरणी जिगर शहा, सूरज चैहान व सात ते आठ अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक लोकेश पवार करीत आहेत.

Case finally registered against father in connection with the kidnapping of a five-year-old girl.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 hours ago