नाशिक

सोन्याची खोटी नाणी देऊन पाच लाखांची फसवणूक

तीन संशयित जेरबंद

वणी : प्रतिनिधी
सोन्याची खोटी नाणी (गिन्या) देऊन पाच लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या टोळीतील तिघा संशयितांना वणी पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून संपूर्ण पाच लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. वणी पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वणी येथील शिंपी गल्लीत राहणारे 68 वर्षीय दिलीप परशराम मोरे यांच्या घरी संशयितांनी संगनमत करून सोन्याच्या दागिन्यांची बतावणी केली. कापडी पिशवीतील पिवळ्या धातूची खोटी नाणी सोन्याची असल्याचे भासवून ती फिर्यादीस दिली आणि त्याबदल्यात त्यांच्याकडून पाच लाख रुपये रोख रक्कम लाटून फसवणूक केली. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक हेमंत फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष कडाळे, पोलीस हवालदार मुज्जू देशमुख व पोलीस शिपाई नीलेश तेलंगे यांच्या पथकाने कळवण, देवळा, चांदवड व मनमाड परिसरात शोध घेतला. यादरम्यान, मनमाड शहरात सापळा रचून संशयित महिलांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेले संशयित वडोदरा (गुजरात) येथील आहेत. तेजलवेन आनंदबाई वाघीरी (वय 35), श्रद्धावेन धीरूबाई वाघीरी (वय 73), रेखाबेहन अनिलभाई वाघीरी (वय 34), तसेच या गुन्ह्यात पप्पूभाई दुग्लभाई सोवासीया याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Five lakh rupee fraud involving counterfeit gold coins; three suspects arrested.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 hours ago