नाशिकमधून कांदा एक्स्प्रेस, महागाई नियंत्रणासाठी कठोर पावले
नवी दिल्ली : प्रतिनिधी
ऐन सणासुदीच्या काळात कांदा आणि साखरेच्या दरांमध्ये मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गेल्या महिनाभरापूर्वी 25 रुपये किलोने मिळणारा कांदा आता अनेक शहरांमध्ये 65 रुपयांच्या पुढे गेला आहे, तर 44 ते 54 रुपयांवर असलेली साखर चक्क 70 ते 71 रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. 12 ते 22 ऑगस्टदरम्यान केवळ दहा दिवसांत साखरेच्या दरात 14 ते 17 रुपयांची अनपेक्षित वाढ झाली. साखर गुवाहाटीमध्ये 71 रुपये आणि दिल्लीसारख्या शहरांत 68 रुपयांवर पोहोचली आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने आता तातडीने मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कांद्याचे भाव आटोक्यात आणण्यासाठी सरकारने कांदा एक्स्प्रेस ही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नाशिकमधून विशेष रेल्वेच्या माध्यमातून थेट दिल्ली, चेन्नई, कोची आणि गुवाहाटीसारख्या देशातील मोठ्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा पाठवला जाणार आहे. यामुळे पुरवठा साखळीतील अडथळे दूर होऊन कांद्याचे दर लवकरच नियंत्रणात येण्याची अपेक्षा आहे.
मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जुन्या रब्बी कांद्याचे साठे झपाट्याने कमी होत आहेत.
आता साखरेच्या वाढत्या किमतींवर आळा घालण्यासाठी सरकारने साठेबाजांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. साखर कारखान्यांवरील नियंत्रणही कडक करण्यात आले असून बाजारात साखरेचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तब्बल दहा लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला सरकारने मंजुरी दिली आहे. सरकारच्या या दुहेरी धोरणात्मक निर्णयामुळे सणासुदीच्या काळात कांदा आणि साखरेच्या किमती कमी होऊन सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात
आहे.
Central government alarmed by sugar prices hitting 70.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…