मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : नागपुरात संगीत विद्यापीठ
मुंबई : प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारी पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतमध्ये नव्या वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयास मंजुरी देण्यात आली. याशिवाय अहिल्यानगर येथे एका नवीन खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्थापनेला शासनाने मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर उपराजधानी नागपूरमध्ये भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत व कला विद्यापीठ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत क्रीडा, उच्च व तंत्रशिक्षण, महसूल तसेच विधी व न्याय विभागाशी संबंधित विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. नाशिकच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे यात नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तर यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पिंपळगावकरांचा नाशिकला येण्याचा त्रास वाचणार आहे.
अहिल्यानगर येथील खासगी आरोग्य विद्यापीठामुळे वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणार्या आणि आरोग्य क्षेत्रात करिअर करू पाहणार्या ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या नवीन आणि आधुनिक संधी उपलब्ध होणार आहेत, तसेच स्थानिक पातळीवर आरोग्य सेवांचे जाळे अधिक बळकट होण्यास मदत मिळणार आहे.
लता मंगेशकर संगीत विद्यापीठ स्थापनेच्या निर्णयामुळे संगीत, कला आणि संस्कृतीच्या जतनासाठी नागपूर हे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल आणि कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी प्राप्त होईल. यासोबतच, राज्यात उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि अधिकाधिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणखी दोन खासगी विद्यापीठांच्या स्थापनेलाही या बैठकीत हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगीरी करणार्या राज्यातील खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना दिल्या जाणार्या रोख बक्षिस धोरणात सुधारणा तसेच जत नगरपरिषदेला प्रशासकीय इमारत उभारणीसाठी मौजे जत (जि. सांगली) येथील 2 हजार 585 चौ. मीटर शासकीय जमीन देण्यास मान्यता दिली आहे.
New Senior Division Civil Court for Pimpalgaon
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…