हलगर्जीपणाचा आरोप; चौकशी समिती स्थापन
मालेगाव : प्रतिनिधी
येथील सावित्रीबाई फुले महिला रुग्णालयात सोमवारी (दि. 23) बाळंतिणीचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी वैद्यकीय अधिकार्यांवर हलगर्जीपणाचा आरोप केला. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रशासनाने जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे.
बागलाण तालुक्यातील करंजाड येथील साक्षी शंकर वनिस (वय 22) यांना रविवारी दुपारी बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल केले होते. सायंकाळी त्यांच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. सोमवारी सकाळी त्यांचा रक्तदाब अचानक कमी झाल्याने उपचार करण्यात आले आणि त्या शुद्धीवर आल्या. मात्र, काही वेळातच प्रकृती पुन्हा खालावल्याने पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालयात हलवित असताना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप करत इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केली. प्रशासनाने ती मान्य करून मृतदेह नाशिक येथे पाठविला. नवजात बालिका मात्र सुरक्षित असून, तिला घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर दोषींवर कारवाई होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक पवार यांनी दिली. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच मुलीचा मृत्यू झाला, दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे.
Childbirth death in Malegaon
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…