नाशिक

सिन्नरकरांना थकीत मालमत्ता करावरील दंडात 100% माफी

आ. माणिकराव कोकाटे यांच्या पाठपुराव्याला यश; 31 मार्चपर्यंत मुदत

सिन्नर : भरत घोटेकर
सिन्नर शहरातील मालमत्ता धारकांसाठी राज्य शासनाने मोठा दिलासा देत थकीत मालमत्ता करावरील दंडात 100 टक्के माफी देणारी ‘अभय योजना’ लागू केली आहे. माजी मंत्री तथा आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हा निर्णय झाला असून, त्यामुळे शहरातील हजारो मालमत्ता धारकांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे.
सर्व थकीत मालमत्ताधारकांनी मूळ कराची 100 टक्के रक्कम भरल्यास सिन्नरकरांना तब्बल 18 कोटी 36 लाख रुपयांच्या दंडातून दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार 19 मे 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या मालमत्ता करावरील दंड (शास्ती) पूर्णपणे माफ केला जाणार आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी मालमत्ता धारकांनी मूळ कराची संपूर्ण रक्कम 31 मार्च 2026 पूर्वी भरणे आवश्यक आहे.
या योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर थकीत कर वसूल होऊन सिन्नर नगरपरिषदेला आर्थिक बळ मिळण्यासोबत शहरातील विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वाढीव घरपट्टीविरोधात घरपट्टी वाढविरोधी कृती समितीने आवाज उठवला होता. संबंध सिन्नर करांच्या हिताची बाब लक्षात घेऊन आमदार माणिकराव कोकाटे यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून दंड माफीची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने यासंदर्भात अभय योजनेचा अध्यादेश जारी केला असून या प्रक्रियेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची शिष्टाई महत्त्वाची ठरली.
यासंदर्भात आमदार कोकाटे यांच्यासोबत नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, गटनेते सागर भाटजिरे, नगरसेवक पंकज जाधव व दत्ता हांडे यांनी मंत्रालयात जाऊन पाठपुरावा केला. 31 मार्च 2026 पर्यंत थकीत कर भरण्याची मुदत असून विलंब न करता लवकरात लवकर कर भरून 100 टक्के दंडमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपाध्यक्ष हर्षद देशमुख, मुख्याधिकारी अभिजीत कदम यांच्यासह सर्व नगरसेवकांनी केले आहे.

Sinnarkar gets 100% waiver on fine on outstanding property tax

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

7 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

7 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

7 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

7 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

8 hours ago