नाशिक

सिगारेट दिली नाही म्हणून चॉपरने वार करून तरुणाचा खून

पेठरोडवरील नवनाथनगर येथील घटना

पंचवटी : प्रतिनिधी
पेठरोडवरील नवनाथनगर परिसरात सिगारेट दिली नाही म्हणून एका युवकाने चॉपरने उलट्या बाजूने डोक्यावर व तोंडावर गंभीर वार करून 27 वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना घडली आहे.
याबाबत कृष्णा हरी राऊत (वय 50 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. रामनगर, राम गार्डनजवळ, पेठ रोड) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दि. 18 रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास साईबाबा मंदिरावजळ, पाटील दवाखान्यामागे, नवनाथनगर, पेठ रोड, पंचवटी येथे फिर्यादी यांचा मुलगा राहुल कृष्णा राऊत व त्याचे मित्र टिल्लू अण्णा पवार व सुनील गुंजाळ हे साईबाबा मंदिराजवळ, पाटील दवाखान्यामागे, नवनाथनगर, पेठ रोड, पंचवटी, नाशिक येथे सिगारेट पीत बसलेले होते. याच दरम्यान रोहिदास वामनराव आहेर (26, रा. नवनाथनगर, पेठ रोड, पंचवटी) हा तिथे आला. त्याने राहुल याच्याकडे सिगारेट मागितली असता, राहुल याने रोहिदास यास सिगारेट दिली नाही म्हणून रोहिदास याने त्याच्या हातातील चॉपरच्या उलट्या बाजूने राहुल याच्या डोक्यावर व तोंडावर मारल्यामुळे राहुल याचे डोक्याच्या आतील बाजूस गंभीर दुखापत केली. यावेळी राहुल यास तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दि. 20 रोजी दुपारी त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ, उपनिरीक्षक अर्चना वाघ आदींनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात रोहिदास वामनराव आहेर (26, नवनाथनगर, पेठ रोड, पंचवटी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पवार करत आहेत.

 

Chopper stabs young man to death for not giving him cigarettes

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जिल्ह्यात दीड वर्षात तीन हजारांहून अधिक मुली, महिला बेपत्ता

ग्रामीण पोलिसांकडून शोधण्याचे प्रमाण 65 टक्के, तर 12 टक्के मुलींचा शोध अद्याप सुरू नाशिक :…

37 minutes ago

मनपाची 27 लाखांची दंडात्मक कारवाई

स्वच्छतेकडे दुर्लक्ष : कचरा वर्गीकरण न करणे, प्लास्टिक वापरणार्‍यांना दणका नाशिक : प्रतिनिधी महापालिकेने कचरा…

46 minutes ago

सप्तशृंगगडावरील 22 किलो चांदी तफावतप्रकरणी चौकशीचे आदेश

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृृंगगडावरील मंदिरातील नक्षीकामातील सुमारे 22 किलो चांदी…

58 minutes ago

कल्पना खरातचा अटकपूर्व अर्ज कोर्टाने फेटाळला

राहाता : भोंदू अशोक खरात याची पत्नीचे कल्पना खरात हिचा बँक व्यवहारात संबंध असल्यामुळे त्यांना…

1 hour ago

बारामती पोटनिवडणुकीसाठी आज होणार मतदान

बारामती : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज, 23 एप्रिल रोजी…

1 hour ago

राज्यात पुन्हा वादळी पावसाचा इशारा

पुण्यात गारांचा पाऊस, उकाड्यामुळे नागरिकांना दिलासा पुणे : हवामान विभागाच्या या अंदाजानंतर मुंबईतील मंत्रालयाकडूनही सतर्कतेचा…

1 hour ago