रशियाच्या मनुष्यबळाला टक्कर देण्यासाठी युक्रेनचा ’मास्टरस्ट्रोक’
कीव्ह/मॉस्को :
युद्धभूमीवर आता केवळ सैनिकच नाही, तर मशिन गनधारी रोबोट्स एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र दिसत आहे. रशिया-युक्रेन युद्धाने आता एका अशा टप्प्यावर प्रवेश केला आहे, जिथे मानवी सैनिकांची जागा वेगाने ’कॉम्बॅट रोबोट्स’ घेत आहेत. रशियाकडे असलेल्या अफाट सैन्यबळाचा सामना करण्यासाठी युक्रेनने आता ’रोबोटिक आर्मी’ मैदानात उतरवली असून, प्रत्यक्ष हल्ल्याच्या मोहिमांमध्ये (सॉल्ट मिशन्स) यांचा वापर सुरू झाला आहे.
युक्रेनमधील रोबोटिक शिफ्ट जगभरातील युद्धामध्ये नवा ट्रेंड आणणार आहे. युक्रेनच्या लष्कराकडून आता अशा अत्याधुनिक रोबोट्सचा वापर केला जात आहे, जे केवळ बॉम्ब शोधण्याचे किंवा रसद पुरवण्याचे काम करत नाहीत, तर प्रत्यक्ष शत्रूवर गोळीबारही करत आहेत. ’सीएनएन’च्या वृत्तानुसार, युक्रेन आता पायदळ सैनिकांच्या ऐवजी ’अनमॅन्ड ग्राउंड व्हेइकल्स’ (यूजीव्हीज) वापरून रशियन बंकर्सवर हल्ले करत आहेत. युद्धाच्या आघाडीवर जिथे मृत्यूचे सावट सर्वांत जास्त असते, अशा ठिकाणी युक्रेन मानवी सैनिकांऐवजी रोबोट्स पाठवत आहे. यामुळे सैनिकांच्या जीवितहानीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होत आहे. रशियाकडे युक्रेनच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त सैनिक आहेत. ही तफावत भरून काढण्यासाठी युक्रेनने तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. एक रोबोट तुटला तर नवीन बनवता येतो, पण सैनिकाचा जीव परत आणता येत नाही, ही रणनीती युक्रेन वापरत आहे. हे रोबोट्स रिमोट कंट्रोलद्वारे काही किलोमीटर अंतरावरून चालवले जातात. त्यांच्यावर कॅमेरे, सेन्सर्स आणि ऑटोमॅटिक मशिनगन्स बसवलेल्या असतात. हे रोबोट्स चिखल, खड्डे आणि काटेरी तारांमधूनही सहज मार्ग काढू शकतात.
युद्धाचे भविष्य : ’रोबोट व्हर्सेस रोबोट’
लष्करी तज्ज्ञांच्या मते, हे आधुनिक इतिहासातील पहिले ’ड्रोन आणि रोबोट’ युद्ध ठरत आहे. आकाशात ड्रोन्सचे वर्चस्व आधीच सिद्ध झाले असताना, आता जमिनीवरही रोबोट्सचा वावर वाढला आहे. येणार्या काळात समोरासमोरच्या लढाईत मानवी सैनिकांचा वापर केवळ या यंत्रांना नियंत्रित करण्यासाठीच मर्यादित राहू शकतो.
Now robots will fight wars; ‘Robotic’ army on the battlefield!
ग्रामीण पोलिसांकडून शोधण्याचे प्रमाण 65 टक्के, तर 12 टक्के मुलींचा शोध अद्याप सुरू नाशिक :…
स्वच्छतेकडे दुर्लक्ष : कचरा वर्गीकरण न करणे, प्लास्टिक वापरणार्यांना दणका नाशिक : प्रतिनिधी महापालिकेने कचरा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृृंगगडावरील मंदिरातील नक्षीकामातील सुमारे 22 किलो चांदी…
राहाता : भोंदू अशोक खरात याची पत्नीचे कल्पना खरात हिचा बँक व्यवहारात संबंध असल्यामुळे त्यांना…
बारामती : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज, 23 एप्रिल रोजी…
पुण्यात गारांचा पाऊस, उकाड्यामुळे नागरिकांना दिलासा पुणे : हवामान विभागाच्या या अंदाजानंतर मुंबईतील मंत्रालयाकडूनही सतर्कतेचा…