नाशिक

284 फुकट्या प्रवाशांना सिटीलिंकचा दणका वाहक-चालकांवरही कारवाई

नाशिक : प्रतिनिधी
सिटीलिंक बसमधून विनातिकीट प्रवास करणार्‍या 284 प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली असून, त्यांच्याकडून 14 हजार 329 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर वाहक एजन्सीच्या 262 प्रकरणांत 30 हजार 493 तर अन्य 170 प्रकरणांत 2.52 लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती सिटीलिंक प्रशासनाने दिली.
नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थात सिटीलिंकच्या वतीने नाशिक शहर तसेच नाशिक शहर हद्दीपासून 20 किमी अंतरापर्यंत नागरिकांना नियमितपणे सार्वजनिक बससेवा उपलब्ध करून देण्यात येते. प्रवाशांना सुरक्षित, सुरळीत व दर्जेदार बससेवा उपलब्ध करून देताना प्रवाशांनीही बससेवेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सिटीलिंक बससेवेतून विनातिकीट प्रवास करणे हे बेकायदेशीर व दंडनीय अपराध आहे. विनातिकीट प्रवास करणारा प्रवासी आढळून आल्यास संबंधित प्रवाशावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येते. तसेच प्रवाशांकडून तिकीट काढण्याच्या कर्तव्यात कसूर करणार्‍या संबंधित वाहक एजन्सीवरही दंडात्मक कारवाई करण्यात येते. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत सिटीलिंकच्या वतीने करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान विनातिकीट प्रवास करणारे एकूण 284 प्रवासी आढळून आले असून, त्यांच्याकडून सुमारे 14 हजार 329 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, वाहकांकडून कर्तव्यात कसूर केल्याच्या एकूण 262 प्रकरणे आढळून आली. यामध्ये प्रवाशांकडून पैसे घेऊन तिकीट न देण्याची 12 प्रकरणे, तर प्रवाशांकडून पैसे न घेता तिकीटही न देण्याची 250 प्रकरणे आढळून आली आहेत. या 262 प्रकरणांमध्ये संबंधित वाहक एजन्सीकडून एकूण रु. 30 हजार 493 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, बससेवा चालविताना प्रवाशांसोबत गैरवर्तन करणे, बसथांब्यावर बस न थांबविणे, नियोजित मार्गाऐवजी अन्य मार्गाने बस मार्गस्थ करणे, मद्यप्राशन करून कर्तव्य बजावणे, नियोजित वेळेपूर्वी बस मार्गस्थ करणे आदी स्वरूपाची एकूण 170 प्रकरणे निदर्शनास आली असून, या प्रकरणांमध्ये संबंधित एजन्सींवर सुमारे 2 लाख 52 हजार इतका दंड करण्यात आला आहे.

तिकीट घेणे जबाबदारी
सिटीलिंक बसमधून प्रवास करताना प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे योग्य भाडे अदा करून वाहकाकडून तिकीट घेणे, तसेच वाहकांनी प्रत्येक प्रवाशाला तिकीट देऊनच प्रवासास अनुमती देणे आवश्यक आहे. तिकीट न घेता प्रवास करणार्‍या प्रवाशांवर तसेच तिकीट देण्याच्या कर्तव्यात कसूर करणार्‍या वाहकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी प्रवाशांनी प्रवासादरम्यान योग्य दराचे तिकीट अवश्य घ्यावे. तसेच वाहकांनी प्रत्येक प्रवाशाला तिकीट देऊनच प्रवास करण्यास अनुमती द्यावी, असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. चालक अथवा वाहकांच्या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास प्रवाशांनी सिटीलिंकच्या अधिकृत हेल्पलाइन क्रमांक, मोबाइल अ‍ॅप्लिकेशन, अधिकृत संकेतस्थळ, ई-मेल अथवा सिटीलिंकच्या कार्यालयात प्रत्यक्ष तक्रार नोंदवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Citylink cracks down on 284 ticketless passengers; action taken against conductors and drivers as well.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

4 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

4 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

4 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

5 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

5 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

5 hours ago