नाशिक

35 हजार चौ.मी. जमीन ‘टीडीआर’द्वारे मनपाच्या हाती

रुग्णालये, क्रीडांगणांचा मार्ग मोकळा

नाशिक : प्रतिनिधी
शहराच्या विकास आराखड्यात विविध सार्वजनिक सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात आरक्षणे निश्चित आहेत. मात्र, जमीनमालकांना रोख मोबदला देऊन ही जमीन संपादित करण्यासाठी मोठ्या निधीची गरज असल्याने अनेक आरक्षणे दीर्घकाळ प्रलंबित होती. मात्र, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी टीडीआर आणि अतिरिक्त एफएसआयच्या वापराबाबत घेतलेल्या निर्णयामुळे पालिकेच्या ताब्यात 35 हजार चौ.मी. जमीन ताब्यात आली आहे. यामुळे रुग्णालये, उद्याने, क्रीडा मैदाने निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
टीडीआर – एफएसआयच्या नियमांमध्ये बदल केल्यानंतर सुमारे 35 हजार चौरस मीटर जमीन महापालिकेच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे या जागांवर उद्याने, क्रीडांगणे, भाजी मार्केट, रुग्णालये तसेच अन्य सार्वजनिक सुविधा उभारण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान, एकीकडे आरक्षित जमिनी ताब्यात घेण्यासाठी टीडीआरचा वापर केला जात असताना, दुसरीकडे अतिरिक्त एफएसआयच्या वापरासाठी 50 टक्के प्रीमियम एफएसआय आणि 50 टक्के टीडीआर वापरणे बंधनकारक केले आहे. परिणामी, आरक्षित जागा प्रत्यक्ष विकसित झाल्यास नागरिकांना त्यांच्या परिसरातच आवश्यक सुविधा मिळू शकणार आहेत. शहराच्या विकास आराखड्यात विविध सार्वजनिक सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात आरक्षणे निश्चित आहेत. मात्र, जमीनमालकांना रोख मोबदल्यासाठी अडून बसल्याचे चित्र होते. पालिकेला जमीन संपादित करण्यासाठी मोठ्या निधीची गरज असल्याने याचमुळे अनेक आरक्षणे दीर्घकाळ रखडली होती. दरम्यान, जमीनमालकांना टीडीआरच्या माध्यमातून विकास हक्क देऊन आरक्षित जमीन ताब्यात घेण्याचा पर्याय महापालिकेने स्वीकारला आहे. यामुळे पालिकेवरील आर्थिक भार कमी तर झालाच, आरक्षित जमिनी उपलब्ध करून घेण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

35,000 sq. m. of land acquired by the Municipal Corporation via TDR.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

4 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

4 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

4 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

4 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

4 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

5 hours ago