नाशिक

इंधन दरवाढीने सिटीलिंकला आर्थिक झळ

प्रशासनाकडून तिकीट दरवाढ?

नाशिक : प्रतिनिधी
पश्चिम आशियात पेटलेल्या युद्धामुळे इंधन व सीएनजीच्या दरवाढीचा आर्थिक फटका शहराची जीवनवाहिनी समजल्या जाणार्‍या सिटीलिंक बससेवेला बसतो आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सिटीलिंक प्रशासन भाडे दरवाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास प्रवाशांना भाडे दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.
नाशिक महापालिकेकडे 250 बसेस असून, त्यांपैकी 200 बसेस सीएनजीवर व 50 बसेस डिझेलवर धावतात. या बससेवेवर हजारो नागरिक प्रवास करतात. शहरात एकूण एक हजार 206 फेर्‍या दररोज होतात. मात्र, वाढत्या इंधनदरामुळे बससेवेच्या दैनंदिन खर्चात वाढ होत आहे. विशेषतः सीएनजीच्या दरातील वाढ आणि पुरवठ्यावरील अनिश्चिततेमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. आधीच सिटीलिंक तोट्यात असतानाच आता इंधन दरवाढीच्या खर्चामुळे येत्या काही दिवसांत सिटीलिंक बससेवेची तिकीट दरवाढ करण्याची शक्यता आहे.
सिटीलिंकने असा निर्णय घेतल्यास त्याचा हजारो विद्यार्थी, नोकरदार, कामगार आणि रोजच्या प्रवाशांना फटका बसेल. 8 जुलै 2021 रोजी शहरात सिटीलिंक सेवा सुरू करण्यात आली. नाशिककरांचा चांगला प्रतिसाद या बससेवेला मिळतो आहे. सहा वर्षांत सिटीलिंकमुळे महापालिकेला 333 कोटी 13 लाख रुपयांचा आर्थिक भार उचलावा लागला आहे. अखेरची दरवाढ 2023 मध्ये झाली होती. सीएनजी व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने मनपाच्या सिटीलिंकला आर्थिक झळ बसत आहे. त्यामुळेच सिटीलिंक प्रशासन तिकीट दरवाढीचा विचार करत असल्याचे समजते आहे.

शहरात पूर्णक्षमतेने सिटीलिंक बससेवा सुरू आहे. एकही
फेरी रद्द करण्यात आलेली नाही. मात्र, इंधनाचे वाढते दर, सीएनजी पुरवठ्यावरील परिणामामुळे वाढता खर्च लक्षात घेता, भविष्यात भाडे दरवाढीबाबत विचार केला जाऊ शकतो.
– विजयकुमार मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारीे, सिटीलिंक

 

Citylink suffers financial blow due to fuel price hike

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago