नाशिक

ताजनपुरे यांनी इशारा देताच रस्तादुरुस्ती

तीन दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांना दिले होते निवेदन

नाशिक : प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक 19 मधील मुख्य वाहतुकीचा रस्ता खोदून ठेवल्याने त्याचा हजारो नागरिकांना फटका बसत होता. दररोज धोकादायक प्रवास या रस्त्याने करावा लागत होता. याप्रकरणी प्रभाग 19 मधील उद्धवसेनेच्या नगरसेविका भारती ताजनपुरे यांनी खराब रस्त्यामुळे अपघात झाल्यास प्रशासन व ठेकेदाराविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा देताच संबंधित ठेकेदाराने या रस्ताकामाला सुरवात केली आहे. यावेळी नगरसेविका भारती ताजनपुरे, युवासेना जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे आदी उपस्थित होते.
दरम्यान, याबाबत माहिती अशी की, नाशिकरोड विभागातील प्रभाग 19 मधील रस्ता मधोमध खोदल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे चित्र होतेे. परिणामी या रस्त्यावर अपघात होण्याची भीती होती. याप्रकरणी उद्धवसेनेच्या नगरसेविका ताजनपुरे यांनी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेऊन सदर रस्त्यावर कोणतीही जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासन व ठेकेदाराची राहील, असा इशाराच दिला होता. तीन महिन्यांपासून मधोमध रस्ता खोदल्याने याचा फटका स्थानिक नागरिकांसह शिर्डी व त्र्यंबकेश्वरकडे येणार्‍या-जाणार्‍या भाविकांना बसत होता. या रस्त्यावरून दररोज दहा हजारांहून अधिक नागरिक वापर करतात. खोदलेल्या रस्त्याकडे मक्तेदारांसह अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले होते. अखेर नगरसेविका ताजनपुरे यांनी प्रशासनाला इशारा देताच याठिकाणी रस्तादुरुस्तीला सुरवात करण्यात आली. याप्रकरणी प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

आमचा कोणत्याही विकासकामांना विरोध नाही; परंतु विकासकामाच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी कोणी खेळत असेल, तर ते सहन करणार नाही. या रस्त्यासंदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. अखेर रस्तादुरुस्तीला सुरुवात झाल्याने नागरिकांचा त्रास कमी होणार आहे.
-भारती ताजनपुरे, नगरसेविका, प्रभाग क्रमांक 19

Road repairs begin as soon as Tajanpure gives warning

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago