नाशिक

द्वारका महामार्ग मंजुरीने वाहतूक कोंडी सुटणार

खा. वाजेंकडून सातत्याने पाठपुरावा; केंद्रीय मंत्री गडकरींचे आभार

नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अखेर महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 वरील द्वारका ते नाशिकरोड या अत्यंत वर्दळीच्या मार्गाच्या सहा पदरीकरणाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दिल्यानंतर नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला. या प्रकल्पाला मंजुरी मिळताच खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांचे आभार मानले. दरम्यान, खा. वाजे यांनी द्वारका ते नाशिकरोड महामार्गासाठी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे.
द्वारका ते नाशिकरोड हा मार्ग शहरातील सर्वाधिक वाहतूक असलेल्या प्रमुख रस्त्यांपैकी एक मानला जातो. दररोज हजारो वाहनांची या मार्गावरून ये-जा होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत या परिसरातील वाहतूक व्यवस्था अक्षरशः कोलमडून पडत असल्याची परिस्थिती होती. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होणार असल्याने ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. याच पार्श्वभूमीवर खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. शहराच्या दीर्घकालीन वाहतूक नियोजनासाठी या मार्गावर अखंड उड्डाणपूल तसेच मेट्रो प्रकल्पाची आवश्यकता असल्याचे त्यांनी वारंवार केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. द्वारका ते दत्तमंदिर चौक या मार्गावरील उड्डाणपूल हा भविष्यातील कायमस्वरूपी उपाय असल्याचा आग्रहही त्यांनी कायम ठेवला होता.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. मात्र, संबंधित प्रकल्पाचा खर्च अत्यंत मोठा असून, तो दीर्घकालीन स्वरूपाचा असल्याचे मत केंद्र शासनाने नोंदविले. सचिव स्तरावरील बैठकीत तातडीने उड्डाणपूल व मेट्रोसारख्या मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देणे वेळेअभावी शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

उड्डाणपूल, मेट्रोची मागणी कायम
या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल आभार मानतानाच खा. वाजे म्हणाले की, मेट्रो प्रकल्प आणि अखंड उड्डाणपूल हेच नाशिकच्या भविष्यातील वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी उत्तर असल्याचे सांगत, त्या दृष्टीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिकरोड ते द्वारका अखंड उड्डाणपूल व्हावा यासाठी कुंभमेळ्यानंतर त्वरित मंजुरी मिळावी यासाठी आतापासूनच पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचा निर्धार वाजे यांनी केला.

नाशिक शहरातील वाढती वाहतूक आणि आगामी कुंभमेळा लक्षात घेता या रस्त्यावरील कोंडी सोडविणे अत्यंत आवश्यक होते. माझी प्राथमिक मागणी अखंड उड्डाणपुलाची होती आणि आजही ती कायम आहे. मात्र, वेळेची मर्यादा लक्षात घेऊन किमान रस्त्याची रुंदी वाढविण्याचा पर्याय पुढे रेटला. त्यास केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला, याबद्दल मंत्री नितीन गडकरी यांचे आभार.
– खा. राजाभाऊ वाजे, नाशिक

Dwarka highway approval will solve traffic congestion

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago