नाशिक

विकासाच्या दाव्यांचे धिंडवडे : रस्त्याअभावी अंत्ययात्रा बैलगाडीतून!

कसबे सुकेणेत पार्थिवाचा चिखलातून प्रवास, प्रशासनाविरोधात संताप

निफाड : तालुका प्रतिनिधी
जिल्ह्यात सधन अन् प्रगत तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथे प्रशासकीय दुर्लक्षाचे विदारक चित्र समोर आले आहे. रस्त्याअभावी ज्येष्ठ नागरिकाच्या पार्थिवाला चिखलातून थेट बैलगाडीतून न्यावे लागल्याची हृदयद्रावक घटना घडल्याने विकासाच्या दाव्यांचे धिंडवडे निघाले आहेत.
गावातील ज्येष्ठ नागरिक संपतराव काळे यांच्या निधनानंतर, वस्तीकडे जाणारा रस्ता चिखलमय असल्याने तेथे कोणतेही वाहन पोहोचू शकले नाही. महसूल नकाशात गोंडेगाव रस्ता अधिकृतपणे नोंदवलेला असतानाही वर्षानुवर्षे या रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. प्रशासनाने खडीकरण किंवा मजबुतीकरण न केल्याने पावसाळ्यात हा रस्ता संपूर्ण दलदलीत बदलतो. परिणामी, नाइलाजाने काळे यांचे पार्थिव बैलगाडीत ठेवून चिखलातून अंत्ययात्रा काढावी लागली. या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे पावसाळ्यातील चार महिने वाहतूक पूर्णपणे ठप्प असते. यामुळे शेतीमालाची वाहतूक, आजारी रुग्ण आणि विद्यार्थ्यांची ये-जा पूर्णपणे कोलमडते. जिवंतपणी या हालअपेष्टा सहन कराव्या लागतातच, पण मृत्यूनंतरही सन्मानाने अंतिम प्रवास करता न आल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
हा वेदनादायी प्रसंग प्रशासनाला जाग आणणारा ठरावा. संबंधित विभागाने या रस्त्यावरील अतिक्रमण तातडीने हटवून रस्त्याचे खडीकरण करावे, अशी ठाम मागणी कसबे सुकेणे ग्रामस्थांनी केली आहे.

 

Claims of development exposed: Funeral procession on a bullock cart due to lack of roads!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago