आ. बंब यांचा मनपा आरोग्य विभागावर गंभीर आरोप
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेतील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या साफसफाई व डायलिसिस सेंटरच्या निविदांमध्ये नियमबाह्य काम करणार्यांची चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, आ. बंब यांनी अधिकार्यांवर गंभीर आरोप करत ही निविदा प्रक्रिया नियमबाह्यपणे झाल्याचे म्हटले आहे.
आ. बंब म्हणाले की, साफसफाई निविदेत संस्थांना शासन निर्णयानुसार ईएमडीमधून सूट असताना, संबंधित अधिकार्यांनी 40 निविदाधारकांना अवैध ठरवून प्रक्रिया बेकायदेशीर केली आहे. तसेच डायलिसिस सेंटर
निविदेत मेक इन इंडिया प्रमाणपत्र व स्थानिक पुरवठादारांना प्राधान्य देण्याच्या बंधनकारक अटीकडे दुर्लक्ष करून काही कंत्राटदारांना अनुचित फायदा देण्याचा प्रयत्न झाल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. यापूर्वीच संबंधित अधिकार्यांच्या संगनमताने कोट्यवधींंचे घोटाळे झाल्याचे पुरावे नाशिक मंडळाकडे सादर झाले आहेत. याप्रकरणी पत्राद्वारे अधिवेशन काळात ही माहिती अत्यावश्यक असल्याने त्वरित चौकशी करून संपूर्ण माहिती सादर करावी, असे स्पष्टपणे कळविले होते. यामुळे सभागृहात हा विषय मांडताना पारदर्शकता राहील व नागरिकांच्या हिताचे रक्षण होईल, असा उद्देश होता. पण पत्र दिल्यापासून एक महिन्याचा कालावधी होत असताना अद्याप कोणतेही प्रत्युत्तर प्राप्त झालेले नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. यामुळे याप्रकरणी आणखी शंका उपस्थित होत आहेत. तरी आपणाकडून लोकप्रतिनिधीचा संदर्भ असलेल्या पत्राची दखल विहित वेळेत घेण्यात आलेली नाही, ही बाब अवमानकारक आहे. या सर्व निविदांची चौकशी केली किंवा कसे, याबाबत तातडीने कळवावे. नियमबाह्य कामकाज करणार्या अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात आली किंवा कसे? अशा संवेदनशील बाबीमध्ये संबंधित अधिकार्यांना दूर ठेवून पारदर्शक व न्याय्य प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असेल तर तेही कळवावे, अशी मागणी आ. बंब यांनी केली आहे.
Cleaning, dialysis center tender illegal
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…