नाशिक

क्षयरोग रुग्णसंख्येत झाली किंचित घट

एमडीआर-टीबीमधील वाढ चिंताजनक

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील क्षयरोग (टीबी) नियंत्रणाच्या कामगिरीत 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये काही प्रमाणात सुधारणा दिसून येत असली, तरी एमडीआर-टीबी (मल्टी ड्रग रेसिस्टंट ट्युबरक्युलोसिस) रुग्णसंख्येत झालेली लक्षणीय वाढ आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे करत आहे.
एमडीआर-टीबी हा क्षयरोगाचा असा प्रकार आहे, ज्यामध्ये क्षयरोगा वर वापरली जाणारी प्रमुख औषधे प्रभावी राहत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे उपचार अपूर्ण ठेवणे, औषधे वेळेवर न घेणे किंवा चुकीच्या पद्धतीने उपचार घेणे. त्यामुळे हा प्रकार अधिक धोकादायक मानला जातो आणि त्यावर उपचार करणे अधिक कठीण असते.
दरवर्षीप्रमाणे 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. यावर्षीची थीम होय, आपण टीबी संपवू शकतो क्षयरोगाचा अंत करण्यासाठी तातडीची कारवाई आणि लोकसहभागावर भर आरोग्य विभागाकडून दिला जाणार आहे.
आरोग्य विभागाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, 2024 मध्ये एकूण 3540 क्षयरोग रुग्ण (लक्ष्य 3600) नोंदले गेले होते, तर 2025 मध्ये ही संख्या घटून 3464 (लक्ष्य 3600) इतकी झाली आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत 2024 मध्ये 2843 (लक्ष्य 2900) रुग्णांची नोंद झाली होती, ती 2025 मध्ये 2719 पर्यंत कमी झाली आहे.
मात्र, खासगी क्षेत्रातील नोंदीत वाढ दिसून येत असून 2024 मधील 697 (लक्ष्य 700) रुग्णांच्या तुलनेत 2025 मध्ये 745 रुग्णांची नोंद झाली आहे, यावरून खासगी रुग्णालयांचा सहभाग व नोंदणी प्रक्रियेतील सुधारणा अधोरेखित होते.
सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे एमडीआर-टीबी रुग्णसंख्येतील वाढ. 2024 मध्ये 96 एमडीआर-टीबी रुग्ण नोंदले गेले होते, तर 2025 मध्ये ही संख्या थेट 176 वर पोहोचली आहे.
याच प्रमाणात उपचारावर ठेवलेल्या रुग्णांची संख्याही 96 वरून 176 पर्यंत वाढली आहे. या वाढीमागे उपचार अपूर्ण ठेवणे, औषधे वेळेवर न घेणे किंवा उपचार अर्धवट सोडणे हे कारणे आहेत.
जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून क्षयरोग निर्मूलनासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून, तपासणी, निदान आणि उपचार यावर विशेष भर दिला जात आहे. क्षयरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार असून, रुग्णांनी 6 ते 8 महिने नियमित औषधोपचार घेणे आवश्यक आहे.

एकूण टीबी रुग्ण (सर्व्ह) :

2024 मध्ये 3540 / 3600, 2025 मध्ये 3464 / 3600, सार्वजनिक क्षेत्र : 2024 मध्ये 2843 / 2900, 2025 मध्ये 2719 / 2900, खासगी क्षेत्र : 2024 मध्ये 697 / 700, 2025 मध्ये 745 / 700.
एमडीआर-टीबी रुग्ण नोंद 2024 मध्ये 96, 2025 मध्ये 176, एमडीआर-टीबी उपचारावर ठेवलेले रुग्ण : 2024 मध्ये 96, 2025 मध्ये 176. यावरून एकूण टीबी रुग्णसंख्येत घट दिसत असली, तरी एमडीआर-टीबी रुग्णसंख्या जवळपास दुप्पट झाल्याचे स्पष्ट होते.

सर्वेक्षण आणि उपचार

जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील अति जोखमीच्या घरांचे सर्वेक्षण करण्यासाठी 112 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 592 उपकेंद्रांमार्फत विशेष पथके नेमण्यात आली आहेत. आतापर्यंत 9 लाख 6 हजार नागरिकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. 1,097 नवीन रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणले आहे.

नागरिकांनी क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणी करून उपचार पूर्ण करणे अत्यावश्यक आहे
– डॉ. राजेंद्र बागूल, अति. आरोग्य अधिकारी

टीबीमुक्त संकल्पासाठी आजपासून जनजागृती

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्हा 2026 अखेरपर्यंत टीबीमुक्त करण्याचा निर्धार आरोग्य विभागाने केला आहे. यासाठी आज, दि. 24 माचर्र्पासून विशेष जनजागृती मोहिमेला सुरुवात होत आहे. राष्ट्रीय क्षयरोग उन्मूलन कार्यक्रम आणि प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून व्यापक पावले उचलण्यात येत आहेत.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आरोग्य यंत्रणा या मोहिमेत सहभागी झाली आहे. याबाबत माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांनी दिली. 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मोहिमेची सुरुवात होणार असून यावर्षीची थीम होय, आपण टीबी संपवू शकतो; नेतृत्व महाराष्ट्र शासनाचे, सामर्थ्य महाराष्ट्राच्या जनतेचे अशी आहे. या अंतर्गत 24 मार्च ते 2 एप्रिलदरम्यान विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यात उद्घाटन, जनजागृती रॅली आणि पथनाट्य (24 मार्च), शाळा-महाविद्यालयांमध्ये रांगोळी व निबंध स्पर्धा (25 मार्च), ग्रामसेवक बैठक (27 मार्च), पोलीस व होमगार्ड प्रबोधन (28 मार्च), पीआरआय सदस्यांचे मार्गदर्शन व निःक्षय मित्र आवाहन (30 मार्च), महिला मेळावा (1 एप्रिल) तसेच एसटी कर्मचारी व प्रवाशांसाठी जनजागृती (2 एप्रिल) यांचा समावेश आहे. या मोहिमेद्वारे क्षयरोगाविषयी जागरूकता वाढवून लोकसहभागातून टीबी निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

क्षयरोगाची लक्षणे

दोन ते तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, थुंकीतून रक्त पडणे किंवा छातीत दुखणे, अनावधानाने वजन कमी होणे आणि सतत थकवा जाणवणे, रात्री घाम येणे, थंडी वाजणे किंवा सतत ताप असणे. यांपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित थुंकी तपासणी करून घ्यावी.

There has been a slight decrease in the number of tuberculosis patients.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अर्ध्यावरचा डाव

- अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…

20 hours ago

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…

20 hours ago

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…

20 hours ago

तांबटी तलावाला दीड कोटीतून नवसंजीवनी

आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…

21 hours ago

पेपरफुटीमुक्त परीक्षा : विधेयकापासून विश्वासार्ह व्यवस्थेकडे

परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…

21 hours ago

तांत्रिक चूक

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

21 hours ago