आस्वाद

सहअस्तित्व

– वासवदत्ता अग्निहोत्री

‘साथी हाथ बढ़ाना
एक अकेला थक जाएगा
मिलकर बोझ उठाना….’
हिंदी चित्रपटात हे गीत खूप प्रसिद्ध होते. कामगारांवर आधारित हे गीत मिळून काम करण्यास प्रवृत्त करते. आपणही कामगार नाही काय? आणि आपणही एकटे राहून काम करत नाही. प्रत्येक कामात सहकार्य लागते, मदतनीस लागतात. काही एक काम एकटे जरी करत असू पण शक्यतोवर सर्वच कामात आपण कुणाचीतरी मदत घेतोच. किंबहुना घेतलेली असते. उदाहरणार्थ जिथे राहतो हे घर जरी आपल्या कमाईतून घेतले आहे तरीही ते बांधायला कामगारांची मदत घेतली होती. उभारणीपासून रंगरंगोटी, सजावट, फर्निचर यात अनेक लोकांची मदत घेतली होती. आपण नकळत सहअस्तित्वात राहतो. एकमेकांवर अवलंबून आहोत. जर बांधकाम करणारे, सजावट करणारे लोक आपली कामं नसतील करणार तर आपण त्यांना पैसे देणार नाही आणि आपण पैसा दिला नाही तर ते जगतील कसे? ही एक शृंंखला आहे, एक चक्र आहे.प्रत्येकजण दुसर्‍यावर अवलंबून आहे आणि प्रत्येकालाच दुसर्‍याची गरज आहे. एकमेकांसोबत निगडित आणि परस्पर दाट संबंध असलेले नाते म्हणजेच सहअस्तित्व.
फार पूर्वीपासून म्हणजेच अगदी सिंधू घाटी सभ्यतेत ही सहअस्तित्वाचे संकेत मिळाले आहेत. त्यांचे निसर्गासोबत सहअस्तित्व होते. ते निसर्गातच राहत होते आणि त्यावर अवलंबूनही होते. आपण अनेक वर्षे नुसत्या निसर्गावर अवलंबून होतो. त्यानंतर वैदिक काळात ही सहअस्तित्वाने जगण्यास उपदेश केले. बुद्ध, महावीर यांनी ‘अनेकांतवाद’ म्हणजेच सत्याचे अनेक सिद्धांत प्रतिपादित केले. त्यांनी सहअस्तित्व टिकवून ठेवण्यात अहिंसावाद प्रमुख आहे, असे सांगितले. सम्राट अशोक यांनी सहिष्णुता आणि ‘सार भंगार’ अर्थात जो आजचा सिद्धांत आहे की सर्वांसोबत सर्वांचाच विकास, असे म्हटले. आपले संत आणि महात्मा यांनी ही तेच म्हटले आणि समाजाला एकसूत्र करण्याचा विचार केला. इतकेच काय मोगल सम्राट अकबर यानेसुद्धा ‘सुलह-ए-कुल’ म्हणजेच सार्वभौमिक शांतीचे अपील केले होते. त्याने ‘इबादतख़ाना’ (प्रार्थना गृह)चे निर्माणही केले होते. त्यानंतर ‘साझा’ म्हणजेच ‘गंगा जमुनी तहज़ीब’ सुरू झाली. याचा अर्थ हिंदी भाषेत उर्दू भाषेचा समावेश झाला. या काळात संगीत, कला, भाषा यांचा भरपूर विकास झाला.
सहअस्तित्व नाकारून जगणे अवघड असते. आपल्याला सहकार्याने जगण्याची सवय आहे. प्रत्येकालाच परस्परसंबंध ठेवणे आवश्यक आहे, कारण आपण खूप सामाजिक आहोत. समाज हे कुटुंबानंतर आपले घर आहे. भारतीय संस्कृतीत समाजाचे एक विशिष्ट स्थान आहे. फार पूर्वीपासून आपला समाज सुदृढ आहे आणि आपणही समाजाची पर्वा करतो. ज्याप्रमाणे एकच देवाची भक्ती करण्याचे अनेक रस्ते असतात तसेच सहअस्तित्व हे एकच आहे पण अनेक लोक त्याला
स्वतःच्या संदर्भात ओळखतात.
‘एकं सद्धिप्रा बहुधा वदन्ति’ अर्थात सत्य एकच आहे, विद्वान त्याला भिन्न-भिन्न स्थानांवक्षींन आमंत्रित करतात.
इंग्रजांनी ‘फोडा आणि राज्य करा’ हा सिद्धांत प्रतिपादित केला होता आणि तो त्यांना फळला. त्यांनी आपल्यावर राज्य केले, आपली संपदा लुटली, अत्याचार केले आणि आपल्याला गुलाम केले. सहअस्तित्वात न रहाण्याचे परिणाम आपण भोगले आहेत म्हणूनच आता सर्व राष्ट्र सहअस्तित्वात आहेत.
आंतरराष्ट्रीय संगठन परस्पर वादावाद निस्तरतात. समान नियम आणि संधिवार्ता करतात. जेणेकरून प्रत्येकाच्या सीमेचा सन्मान करतात आणि सुरक्षासुद्धा होते. व्यापारउद्योगात एकमेकांचे सहअस्तित्व असल्याने आपसात एकोपा निर्माण होतो आणि युद्धाची संभावना कमी होते. आज जगाला शांतिपूर्ण विकास आणि मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत हे फक्त सहअस्तित्वानेच संभाव्य आहेत. परस्पर सौहार्द ठेवण्यास सहअस्तित्व टिकवून ठेवावेच लागेल.

Coexistence

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मुखवट्यामागे दडलेला स्वार्थ!

- अफजल पठाण चेहरे तो बहुत मिले जिंदगी की राहों में, कुछ अपने बनकर मिले,…

8 minutes ago

भोळी बाभळी

- प्रणाली देशमुख तू सुंदर आहेस पण ग्लॅमरस नाही, कदाचित म्हणूनच तू गुणाची खाण जरी…

14 minutes ago

जिवंत बुरशीपासून कपडे

- डॉ. किशोर पवार कपडे म्हणजे निर्जीव वस्तू, अशी आपली आजवरची संकल्पना होती. मात्र, चीनमधील…

25 minutes ago

स्त्रीचा संघर्ष संपतो तरी कधी?

लग्नाआधी मैत्रिणींच्या गप्पा असतात कुठे फिरायला जायचं? शॉपिंगला कधी भेटायचं? आज काय प्लॅन? आणि लग्नानंतर…

32 minutes ago

मोकळीक

स्वैराचार नव्हे, जबाबदारीची जाणीव आजच्या आधुनिक युगात ‘मोकळीक’ किंवा ‘स्वातंत्र्य’ हा शब्द प्रत्येकाच्या जीवनाचा महत्त्वाचा…

36 minutes ago

पांढर्‍या सोन्याची काळी कहाणी

शेतात डोलणारा कापूस दुरून पाहिला की डोळ्यांना पांढरेपण दिसते. मात्र, त्या पांढर्‍या बोंडामागे उभ्या असलेल्या…

49 minutes ago