नाशिक

श्वेतपत्रिकेसाठी आयुक्तांचे विभागप्रमुखांना पत्र

प्रशासकीय राजवटीतल्या कामांचा लेखाजोखा

नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेत चार वर्षे असलेल्या प्रशासकीय राजवटीत अनागोंदी होऊन गैरमार्गाने कोट्यवधींची कामे अधिकार्‍यांनी मार्गी लावल्याचा संशय लोकप्रतिनिधींना आहे. त्यामुळे चार वषार्ंतल्या कामकाजाचा लेखाजोखा प्रशासनाने महासभेत ठेवण्याची मागणी सर्वपक्षीयांनी केली होती. महापौर हिमगौरी आडके यांनी सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन चार वर्षांच्या कामाचा हिशोब ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी
महापालिकेच्या सर्व विभागांना नुकतेच पत्र धाडत लवकरात लवकर चार वर्षांतली माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले आहेत.
महासभेत भाजप, दोन्ही शिवसेनेने चार वर्षांतल्या कामांचा लेखाजोखा सभागृहाला देण्याची मागणी केली होती. महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली 18 मार्चला झालेल्या महासभेत प्रशासकीय काळातील कामांचा हिशेब सादर करण्याचा मुद्दा चांगला गाजला होता. आयुक्तांनी माहिती देण्याचे फर्मान काढल्यानंतर अधिकार्‍यांची धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान, श्वेतपत्रिका तयार झाल्यानंतर ती महासभेत सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रशासकीय काळातील कामकाज, खर्च व निर्णयप्रक्रियेचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे याकडे शहराचे लक्ष लागले आहे. महापौरांच्या
निर्देशानंतर सुरू झालेल्या या प्रक्रियेमुळे प्रशासनाची कोंडी होण्याची शक्यता आहे. नागरिकांसमोर महापालिकेच्या चार वर्षांच्या कारभाराचा सविस्तर लेखाजोखा मांडला जाणार आहे. प्रत्येक विभागाने विकासकामांचा तपशील, खर्च, प्रलंबित व अपूर्ण प्रकल्प, निविदा प्रक्रिया, कंत्राटांची माहिती, आर्थिक व्यवहारांचा अहवाल सादर करणे बंधनकारक केले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित कामांची माहिती स्वतंत्रपणे सादर करण्याचे
निर्देशही देण्यात आल्याचे समजते.

Commissioner’s letter to department heads for white paper

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago