व्हॅन-सिमेंट मिक्सरची धडक
शहापूर : प्रतिनिधी
कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर कल्याण तालुक्यातील रायते गावाजवळ भीषण अपघात झाला. प्रवासी वाहतूक करणारी व्हॅन आणि सिमेंट मिक्सर यांच्यात झालेल्या धडकेत प्रवासी व्हॅनमधील पाचहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यात प्रवासी व्हॅनचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत जखमींना मदत केली. कल्याण- अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे.काँक्रीटीकरणही केले जात आहे. त्यामुळे प्रवास वेगवान झाला आहे. मात्र, अनेक वाहनांचे नियंत्रण सुटत असल्याने अपघातही होत असल्याचे समोर आले होते. कल्याण ते मुरबाड, सरळगाव, टोकावडे दरम्यान प्रवासी वाहतूक करण्यासाठी व्हॅन चालतात. या व्हॅनमध्ये खचाखच प्रवासी भरले जातात, अशी ओरड होतेे. सोमवारी अशाच एका प्रवासी व्हॅनचा भीषण अपघात झाला. या धडकेत व्हॅनचा चक्काचूर झाला. यावेळी चालकासह अनेक प्रवासी अत्यवस्थ पडले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यातील किमान पाच जण मृतावस्थेत असावेत, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. व्हॅनमध्ये जवळपास दहा ते अकरा प्रवासी असावेत, अशीही माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्यातील अत्यवस्थ व्यक्तींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात नेमके किती प्रवासी मृत्युमुखी पडले याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
Five killed in horrific highway accident
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…