डीबीटीद्वारे मदत वितरण सुरू; 109 गावांतील 9,142 शेतकर्यांना लाभ
सिन्नर : प्रतिनिधी
मार्च महिन्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सिन्नर तालुक्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर कृषी व महसूल विभागाने केलेल्या संयुक्त पंचनाम्यांच्या आधारे शासनाने 10 कोटी 12 लाख 27 हजार 706 रुपयांची नुकसानभरपाई मंजूर केली असून, लाभार्थी शेतकर्यांच्या बँक खात्यांमध्ये डीबीटी प्रणालीद्वारे रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती तहसीलदार सुरेंद्र देशमुख व निवासी नायब तहसीलदार सागर मुंदडा यांनी दिली.
या निर्णयामुळे तालुक्यातील 109 गावांतील 9,142 शेतकर्यांना थेट लाभ मिळणार असून, गारपिटीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गारपिटीनंतर आमदार माणिकराव कोकाटे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी
केली होती.
त्यानंतर महसूल व कृषी विभागाला तातडीने पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तहसीलदार सुरेंद्र देशमुख व तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे यांनी संयुक्त पंचनामे करून प्रस्ताव शासनाकडे पाठविल्यानंतर शासनाने मदतीस मंजुरी दिली. डीबीटीद्वारे नुकसानभरपाईचे वितरण सुरू झाले असून, ज्या नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या बँक खात्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करून घ्यावी. त्यामुळे नुकसानभरपाईची रक्कम खात्यात जमा होण्यास कोणताही अडथळा येणार नाही, असे तहसीलदार सुरेंद्र देशमुख म्हणाले.
भरपाईमुळे दिलासा
उन्हाळी कांदा, गहू, डाळिंब आणि द्राक्ष पिकांचे गारपिटीत मोठे नुकसान झाले होते. आमदार माणिकराव कोकाटे यांनी तातडीने पंचनाम्याच्या सूचना दिल्याने मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. सर्वाधिक फटका बसलेल्या सोमठाणे परिसरातील शेतकर्यांना योग्य प्रमाणात भरपाई मिळाली आहे. इतर गावांनाही नुकसानीच्या प्रमाणात मदत मंजूर झाली असून, उर्वरित शेतकर्यांनाही लवकर लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे.
– कचेश्वर कोकाटे, शेतकरी, सोमठाणे
सर्वाधिक गारपीटग्रस्त गावनिहाय मंजूर नुकसानभरपाई
गाव शेतकरी संख्या भरपाई रक्कम
सोमठाणे 489 82,03,470
नायगाव 489 63,16,300
देवपूर 433 56,04,100
वडगाव पिंगळा 421 45,61,440
उजनी 318 42,81,710
पिंपळगाव 312 39,46,835
शिवडे 319 37,75,870
सांगवी 337 35,63,180
निमगाव देवपूर 309 26,16,960
किर्तांगळी 185 25,96,900
Compensation of ₹10.12 crore for hailstorm-affected farmers
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…