नाशिक

महारोजगार मेळाव्यात 659 युवकांच्या हातात नियुक्तीपत्रे

25 हजार युवकांना रोजगार देण्याचे मविप्रचे उद्दिष्ट

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित महारोजगार मेळाव्याने अनेक बेरोजगार युवकांच्या रोजगाराचे स्वप्न साकार केले.
मेळाव्यात अडीच हजार उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी पात्र ठरलेल्या 659 उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. दहा हजारांहून अधिक युवकांनी नावनोंदणी करून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
समारोपप्रसंगी मविप्र संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी शिक्षणासोबत रोजगारनिर्मितीही संस्थेचे महत्त्वाचे ध्येय असल्याचे सांगितले. सुशिक्षित युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून 25 हजार बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे होते. यावेळी मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, मनोज भगत, राजीव ठाकरे, सीआयआयचे व्यवस्थापक सागर शिरसाठ, सागर चौधरी, प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे, उपप्राचार्य आर. व्ही. पवार, उपप्राचार्य एस. बी. शेलार आणि मेळाव्याचे समन्वयक प्रा. डॉ. राम सोनवणे उपस्थित होते.
बाळासाहेब क्षीरसागर यांनी राज्यभर आयोजित रोजगार मेळाव्यांमधून आतापर्यंत सहा हजार युवकांना रोजगार मिळाल्याची माहिती दिली.
डेन्मार्क आणि जपानमधील कंपन्यांनी तीन लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक वेतनाच्या नोकर्‍यांची संधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे यांनी प्रास्ताविकात मेळाव्याच्या नियोजनाची माहिती दिली. संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली महिनाभर नियोजन करून हा उपक्रम यशस्वी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. डॉ. डी. बी. वेलजाळी यांनी सूत्रसंचालन, प्रा. डॉ. राम सोनवणे यांनी प्रमाणपत्र वाचन, तर उपप्राचार्य आर. व्ही. पवार यांनी आभार मानले.

नामांकित कंपन्यांचा सहभाग

तालुक्यात प्रथमच झालेल्या या महारोजगार मेळाव्यात फार्मा, आयटी, ऑटोमोबाइल, बँकिंग आणि सेवा क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. महिंद्रा, बजाज, टाटा, बॉश, डब्ल्यूएनएस, एचडीएफसी, आयसीआयसीआय, एअरटेल आदी कंपन्यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची निवड केली.

 

Appointment letters handed to 659 youths at the mega job fair.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago