नाशिक

पस्तीस लाख जन्म-मृत्यू दाखल्यांचे संगणकीकरण

मनपा करणार मोडी लिपी तज्ज्ञांचे आउटसोर्सिर्ंग

नाशिक : प्रतिनिधी
जीर्ण झालेल्या जन्म-मृत्यू नोंदी, तसेच ऐतिहासिक मोडी लिपीतील अभिलेखांचे आधुनिक डिजिटायझेशन (संगणकीकरण) आणि भाषांतर करण्यासाठी आवश्यक आर्थिक तरतुदीचा प्रस्ताव मनपाच्या आरोग्य विभागाने महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे सादर केला आहे. या प्रस्तावामुळे हजारो महत्त्वपूर्ण सरकारी अभिलेख कायमस्वरूपी सुरक्षित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच याद्वारे 35 लाख दाखल्याचे संगणकीकरण केले जाणार आहे. यासाठी मोडी लिपी जाणणार्‍या तज्ज्ञांचे आउटसोर्सिंग करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे.
नाशिक महापालिकेच्या पूर्व विभागातील जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयातील हजारो जीर्ण व नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या अभिलेखांचा मुद्दा यामुळे सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सन 1957 पासून पुढील वीस वर्षांचे दाखले यात असून, तत्कालीन लिपी समजण्यासाठी जाणकारांची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी बाह्यस्रोतातून कर्मचारी भरले जाणार असल्याचे महापालिकेचे आरोग्याधिकारी तथा जन्म-मृत्यू मुख्य निबंधक डॉ. विजय देवकर यांनी सांगितले. जन्म आणि मृत्यू दाखले हे प्रत्येक नागरिकाच्या कायदेशीर अस्तित्वाचे व हक्काचे मूलभूत दस्तऐवज मानले जातात. शाळा-महाविद्यालय प्रवेश, पासपोर्ट, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, सरकारी योजनांचा लाभ, वारसा हक्क, बँक व्यवहार, विमा दावे आणि कुटुंब निवृत्तिवेतन यांसारख्या अनेक महत्त्वाच्या कामांसाठी हे दाखले अनिवार्य असतात. मात्र, पूर्व विभागीय कार्यालयातील हजारो मूळ नोंदी जीर्ण अवस्थेत असल्याने आणि अनेक कागदपत्रे अक्षरशः नष्ट होण्याच्या स्थितीत पोहोचल्याने नागरिकांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली आहे. पण महापालिकेने आता याबाबत संगणकीकरणाचा निर्णय घेतल्याने नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.

Computerization of thirty-five lakh birth and death certificates

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

4 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

4 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

4 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

4 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

4 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

5 hours ago