नाशिक

उशिराचे शहाणपण; पावसाने झोडपल्यानंतर कामांना गती

ड्रेनेज, चेंबरची बुधवारी दिवसभर स्वच्छता

नाशिक : प्रतिनिधी
शहरात मंगळवारी (दि. 2 जून) झालेल्या अचानक व जोरदार पावसानंतर काही भागांत पाणी साचणे, चिखल निर्माण होणे, तसेच सुरू असलेल्या रस्ते व युटिलिटी कामांच्या ठिकाणी वाहतुकीस अडथळे निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, महापालिकेने वेळेत कामे पूर्ण न केल्याचा फटका शहरवासीयांना मंगळवारी बसला. मान्सूनपूर्व पावसामुळे शहरातील रस्ते जलमय होऊन रस्ते चिखलमय झाल्याचे चित्र होते. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी), तसेच संबंधित यंत्रणांनी तातडीने मैदानात उतरून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत.
महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली विभागनिहाय पथके कार्यरत करण्यात आली आहेत. शहरातील विविध भागांत स्टॉर्म वॉटर ड्रेनेज चेंबर उघडणे, गाळ व कचरा काढणे, पाण्याचा निचरा सुरळीत करणे, आवश्यकतेनुसार पंपांच्या सहाय्याने पाणी उपसणे, रस्त्यांवरील अडथळे दूर करणे, तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. याचबरोबर महापालिकेमार्फत विभागनिहाय पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला जात आहे. पावसामुळे प्रभावित झालेल्या ठिकाणी तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तसेच नाशिकच्या दीर्घकालीन आणि शाश्वत विकासासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते, पर्जन्यजल वाहिन्या, पाणीपुरवठा, ड्रेनेज, गॅस पाइपलाइन आणि ऑप्टिकल फायबर केबल यांसारखी पायाभूत सुविधा विकासकामे सुरू आहेत. दरम्यान, कामांत अनावश्यक विलंब, दर्जाबाबत त्रुटी अथवा सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार दंडात वाढ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अचानक झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या असल्या, तरी सर्व यंत्रणा पूर्णक्षमतेने कार्यरत आहेत. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. विकासकामे ही शहराच्या दीर्घकालीन हितासाठी असून, गुणवत्ता, सुरक्षितता आणि वेळेचे पालन याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे आयुक्त खत्री यांनी सांगितले.

Late wisdom; Work accelerated after heavy rains

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोहाडीत मोहाडमल्ल महाराजांची शतकाची रोठ परंपरा

लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…

19 hours ago

सिंहस्थाच्या नावाने त्र्यंबकेश्वरचे रस्ते गाळात

ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…

19 hours ago

पावसा पावसा… तू पण!

नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…

19 hours ago

अब्दुल्लांचे आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…

19 hours ago

जीवघेणे खड्डे !

पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…

19 hours ago

खड्डेमुक्तीसाठी मंत्री महाजनांचा सात दिवसांचा अल्टिमेटम

अन्यथा अधिकार्‍यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…

20 hours ago