‘गुंगी गुडिया’चे पडसाद; दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी
नाशिक : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून करण्यात आलेल्या कथित ‘गुंगी गुडिया’ या उल्लेखाचे पडसाद बुधवारी शहरात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून काँग्रेसच्या शहर कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढत काँग्रेसविरोधात जोरदार आंदोलन केले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. दुसरीकडे, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही कार्यालयासमोर जमून आंदोलनाला प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मोर्चादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ आणि काँग्रेसविरोधात घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. संभाव्य कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार सरोज आहिरे, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, दिलीप खैरे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, युवक अध्यक्ष अंबादास खैरे, आकाश पगार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी झाले. तर काँग्रेसकडून शहराध्यक्ष बबलू खैरे, उद्धव पवार, ज्ञानेश्वर काळे, जाकीर अत्तार, इसाक कुरेशी, गौरव सोनार, अनिल बहोत, सुदेश मोरे, संदीप वाघ, दत्ता सोनवणे, गोपाळ लहांगे, बाबा खतीब, सुनील आव्हाड, फारुख कुरेशी, शंकर जाधव, जावेद शेख, संतोष ठाकूर, संतोष कस्तुरे, आकाश घोलप, योगेश गांगुर्डे, सय्यद मनियार, गोरख साळवे, अनिल बेग, विजय पाटील, प्रवीण काटे, अरुण दोंदे, जयेश पोकळे, अशोक शेंडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार सरोज आहिरे यांनी काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध केला. राज्यातील महिलांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठेपणा दाखवत सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
आम्ही काँग्रेसच्या वक्तव्याचा निषेध करतो. हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठे मन करत सुनेत्रा पवार यांची माफी मागावी, काँग्रेसने ज्या पद्धतीने सुनेत्रा पवार यांच्याविषयी अपशब्द वापरले आहेत ते निषेधार्थ आहे. राज्यातील सर्व महिला सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी असून, सपकाळांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आला. -आ. सरोज आहिरे, राष्ट्रवादी
कोणत्याही महिलेचा अपमान करण्याचा उद्देश नाही. संबंधित वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. सुनेत्रा पवार यांनी महिलांचे आणि शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, या अर्थाने ते विधान करण्यात आले होते. राष्ट्रवादीने काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढण्याऐवजी नाशिकमधील खड्डे, अपघात आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर महापालिकेविरोधात आंदोलन करायला हवे होते. – बबलू खैरे, शहराध्यक्ष, काँग्रेस
Congress and NCP face off!
- प्रणाली देशमुख ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत…
- विजया अवचार प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही…
- जगन घाणेकर यंदाचा पावसाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी जेव्हापासून त्याचे आगमन झाले…
तीन राज्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची चर्चा सर्वत्र होत आहे. भाजपाला दोन…
नीलेश देशमुख : ऑगस्ट 2026 पासून निर्णय लागू; चार हजार कर्जदारांना लाभ नाशिक : प्रतिनिधी…
समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक : सभापती सानप नाशिक : प्रतिनिधी शहरातील महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह डॉ.…