नाशिक

माळेगाव एमआयडीसीतील खड्डे बनले मृत्यूचे सापळे

सीमा संघटना एमआयडीसी प्रशासनाविरोधात आक्रमक

सिन्नर : प्रतिनिधी
मुसळधार पावसानंतर सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि कामगारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच एमआयडीसी प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल उपस्थित करत सीमा संघटनेने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
सीमाचे सचिव बबन वाजे यांनी एल अँड टी फाटा ते मायलन कंपनीदरम्यानचा रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याचा आरोप केला. या मार्गावरून दररोज हजारो कामगार, उद्योजक आणि मालवाहू वाहने प्रवास करत असताना रस्त्यांवरील मोठे खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
मागील महिन्यात खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ते पुन्हा उखडल्याचा आरोप करत संबंधित कंत्राटदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली. तसेच एमएनजीएलच्या गॅस पाइपलाइनच्या कामानंतर रस्ते पूर्ववत न केल्यानेही अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याचे सीमाने निदर्शनास आणले. अंबड एमआयडीसीतील खड्ड्यामुळे कामगाराचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा उल्लेख करत सिन्नरमध्येही अशी दुर्घटना होण्यापूर्वी प्रशासनाने जागे व्हावे, अशी मागणी करण्यात आली. खड्ड्यांमुळे कामगारांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, वाहनांच्या देखभाल खर्चातही वाढ झाल्याचे सीमाने म्हटले आहे.
नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांच्या संयुक्त बैठकीनंतर सातपूर आणि अंबड एमआयडीसींमध्ये रस्ते दुरुस्तीचे काम सुरू झाले असताना सिन्नर एमआयडीसीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. सिन्नरमधील सर्व खड्डे तातडीने बुजवावेत, एल अँड टी फाटा ते मायलन कंपनी हा रस्ता प्राधान्याने दुरुस्त करावा, पावसाच्या पाण्याच्या निचर्‍याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी आणि निकृष्ट काम करणार्‍या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सीमाचे अध्यक्ष सुकुमार नायर, उपाध्यक्ष किरण भंडारी, सचिव बबन वाजे, खजिनदार राहुल नवले, विश्वस्त रतन पडवळ, अरुण चव्हाणके, मुकेश देशमुख, मारुती कुलकर्णी, सारंग कुलकर्णी, किरण वाघ, दिनेश करवा, शांताराम दारुंटे, सुधीर जोशी, गणेश तटाने, नवनाथ नागरे, दत्ता नवले, शशी नवले, शरद टर्ले तसेच अन्य उद्योजकांनी केली आहे.
प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास भविष्यात होणार्‍या कोणत्याही अपघाताची व जीवितहानीची संपूर्ण जबाबदारी एमआयडीसी प्रशासनाची राहील, असा इशाराही ‘सीमा’ने दिला आहे.

Potholes in Malegaon MIDC have become death traps.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अमेरिकेच्या दबावामुळे यूपीआय आणि रुपे व्यवहारांवर ’एमडीआर’ शुल्क

नवी दिल्ली : प्रतिनिधी यूपीआय आणि रुपे कार्डद्वारे होणार्‍या व्यवहारांवर लवकरच ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ (एमडीआर)…

3 minutes ago

देवळा-मालेगाव रस्त्यावर अपघातात दोघे जागीच ठार

नाशिक : प्रतिनिधी देवळा-मालेगाव रस्त्यावर वनक्षेत्र परिसरातील पिंपळगाव वळणावर शुक्रवारी (दि. 7) सायंकाळी पाचच्या सुमारास…

12 minutes ago

महिनाभरात पात्र शेतकर्‍यांचा सातबारा कोरा

मुख्यमंत्री फडणवीस : ‘एनपीए’ मुळे लागलेले अतिरिक्त व्याज रद्द मुंबई : प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर…

17 minutes ago

खड्ड्यांवरून खडे बोल!

♦ नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा तयारी आढावा बैठक ♦ महाकुंभ तोंडावर; रिलॅक्स राहून चालणार नाही! मुंबई :…

28 minutes ago

मोगरा फुलला

- प्रणाली देशमुख ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत…

21 hours ago

समावेशित शिक्षणातून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा

- विजया अवचार प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही…

21 hours ago