format: 0; filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; motionR: 0; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 12582912;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 179.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 32;
मृतांच्या वारसांना भरीव मदत करा; आयुक्तांना निवेदन
नाशिक : प्रतिनिधी
‘मनपा प्रशासनाचा धिक्कार असो, अधिकारी भाऊ आता तरी पैसे नको खाऊ, ठेकेदार भाऊ आता तरी पैसे नको खाऊ,’ ‘धिक्कार असो धिक्कार असो, कमिशनखोरी करणार्यांचा धिक्कार असो,’ अशा घोषणा देत काँग्रेसने शहरातील खड्ड्यांप्रश्नी राजीव गांधी भवनसमोर निदर्शने करीत मनपाला निवेदन दिले.
शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली कुठलेही नियोजन न करता संपूर्ण शहर खोदून ठेवल्याने काँग्रेसने काल आंदोलन केले. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष नीलेश खैरे यांनी मनपा प्रशासन व सत्ताधार्यांविरोधात जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, मनपाच्या आयुक्त, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांनी स्वतः टोळ्या निर्माण करून कुंभमेळ्यासाठी आलेल्या पंचवीस हजार कोटी रुपयांवर डोळा आहे. तो ठेका संबंधित ठेकेदारालाच कसा मिळेल याची काळजी घेताना ते नाशिककरांची जबाबदारी पूर्णपणे विसरले आहेत. त्यांना भानावर आणण्यासाठी हे आंदोलन असल्याचे स्पष्ट केले. यावेळी मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा. खड्ड्यांमुळे अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना जाहीर केलेली मदतीची रक्कम तुटपुंजी असून, ती भरीव स्वरूपाची असावी. तसेच जखमी व्यक्तींना उपचारासाठी योग्य ती मदत तातडीने द्यावी, खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर मनुष्यवधासारखे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष शरद आहेर, उल्हास सातभाई, महिला अध्यक्षा स्वातीताई जाधव, उद्धव पवार, ज्ञानेश्वर काळे, जयेश पोकळे, अभिजित राऊत, भारत पाटील, जाकिर अत्तार, भालचंद्र पाटील, सुदेश मोरे, गौरव सोनार, दत्ता सोनवणे, वृंदा शेरे, ज्युली डिसूझा, मीरा साबळे, नुरी आप्पा, अनिता खरारे, संदीप वाघ, अॅड. सागर वाहुळे, श्रीकांत शेरे, विलास निकुंभ, मुश्ताक कुरेशी, संतोष ठाकूर, अरुण दोंदे, हर्षल पवार, कैलास कडलग, धोंडीराम बोडके, संतू पाटील गायभावे, रामकिसन चव्हाण, अशोक शेंडगे, श्रीकांत शेरे, इसाक कुरेशी, मोहन शिंदे, लक्ष्मण धोत्रे, गोकुळ राव, सोमनाथ मोहिते, संतोष कस्तुरे, शंकर जाधव, योगेश गांगुर्डे, मकरंद जाधव, राजेंद्र महाले, संजय पाटील, जावेद पठाण, हर्षवर्धन कापडणीस, आकाश घोलप, गोरख साळवे उपस्थित होते.
Congress protests outside the Municipal Corporation over the issue of potholes.
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik