974 पैकी 131 कोटीच झोळीत; ‘एसआयआर’चा फटका
नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेने एप्रिल ते जूनदरम्यान कर सवलत देऊनही मिळकतदारांकडे तब्बल 844 कोटींचा डोंगर आहे. चालू व मागील थकबाकी अशी एकूण 974 कोटी रुपयांच्या वसुलीचे आव्हान पालिकेसमोर आहे. कर विभागाला आतापर्यंत अवघे 131 कोटी रुपयेच वसूल करण्यात यश आले आहे. दरम्यान, कर विभागातील 123 कर्मचार्यांना (एसआयआर) मतदार पुनरीक्षण कामात गुंतवल्याने याचा मोठा फटका करवसुलीवर झाला आहे.
नियमित कर भरणार्यांसह वर्षानुवर्षे थकबाकी असणार्यांसाठी प्रशासन दरवर्षी कर सवलत योजना राबवत असते. आठ टक्क्यांपासून ते चार टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते. मनपा आयुक्तांनी कर संकलन विभागाला 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता साडेतीनशे कोटींचे टार्गेट दिले आहे. चालू मागणीसह वर्षानुवर्षे रखडलेल्या थकबाकी वसुलीचे आव्हानदेखील असते. यंदा मागील थकबाकी 749 कोटी व चालू मागणी 225 कोटी एवढी आहे. दरम्यान, सद्यस्थित पालिकेला तब्बल 844 कोटी वसुलीचे दिव्य पार करायचे आहे. थकबाकीकडे पाठ फिरवणार्यांविरोधात कर विभाग कारवाईची भीती दाखवून वसुली करत असते. सध्याच्या घडीला (एसआयआर) मतदार पुनरीक्षणचे काम सुरू असल्याने कारवाई करणे शक्य नसल्याने करवसुलीचा आलेख खाली आला आहे. महापालिका हद्दीतील घरे, प्लॉटधारकांकडून दरवर्षी घरपट्टी आकारली जातेे. महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत घरपट्टी व पाणीपट्टीतून मिळणारा कर आहे. यंदा चालू वर्षासाठी घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची रक्कम तीनशे कोटी आहे.
विभागनुसार थकबाकीची माहिती
विभाग एकूण थकबाकी वसूल रक्कम शिल्लक रक्कम
सातपूर 10264.47 15 कोटी 61 लाख 87 कोटी 13 लाख
नाशिक पश्चिम 11841.54 21 कोटी 66 लाख 96 कोटी 88 लाख
नाशिक पूर्व 17864.54 20 कोटी 87 लाख 157 कोटी 89 लाख
पंचवटी 25685.76 24 कोटी 34 लाख 232 कोटी 62 लाख
नवीन नाशिक 15388.53 28 कोटी 4 लाख 126 कोटी
नाशिकरोड 16409.98 20 कोटी 54 लाख 143 कोटी 64 लाख
एकूण 97454.82 131 कोटी 7 लाख 844 कोटी 19 लाख
Tax arrears mount to over ₹850 crore.
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik