नाशिक

राहुड घाटात ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरचा चुराडा

केबिनमधील चालकाला शर्थीनंतर जीवदान

चांदवड : प्रतिनिधी
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत धोकादायक मानल्या जाणार्‍या राहुड घाटात अचानक ब्रेक फेल झाल्याने एका भरधाव कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनरच्या केबिनचा चक्काचूर होऊन चालक आतच गंभीर जखमी अवस्थेत अडकला होता. स्थानिक नागरिक व नाणीज संस्थानाच्या रुग्णवाहिका चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पाऊण तासाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. ही घटना बुधवारी (दि. 2) दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास घडली. रवींद्र कुमार उपाध्याय (रा. लखनौ, उत्तर प्रदेश) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर कंटेनर मुंबईहून मालेगावच्या दिशेने जात असताना राहुड घाटातील तीव्र उतारावर अचानक त्याचे ब्रेक निकामी झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हायवेवर भीषण अपघात घडला. अपघाताची तीव्रता इतकी प्रचंड होती की, कंटेनरच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आणि चालक रवींद्र कुमार आत रक्ताच्या थारोळ्यात दाबले गेले. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान (नाणीज) यांच्या मोफत रुग्णवाहिकेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका चालक आणि स्थानिक नागरिकांनी पत्रे कापून व बाजूला करून चालकाला सुरक्षित बाहेर काढले. जखमी चालकाला तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वेळेत मदत मिळाल्याने चालकाचे प्राण वाचले असून, नागरिकांच्या आणि रुग्णवाहिका चालकाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Container mangled after brake failure in Rahud Ghat.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

18 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

18 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

18 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

18 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

19 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

19 hours ago