नाशिक

महिंद्रा स्कॉर्पिओ चोरीचा गुन्हा उघड

एक आरोपी जेरबंद, 20 लाखांची गाडी हस्तगत

देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
सातपूर परिसरातून चोरीला गेलेली महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ चारचाकी गाडी नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने अवघ्या 24 तासांत शोधून काढली असून, याप्रकरणी एका आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे. पोलिसांनी सुमारे 20 लाख रुपये किमतीची चोरीची स्कॉर्पिओ गाडी हस्तगत केली आहे.
सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 726/2026, भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. भवानी व्हील्स महिंद्रा सर्व्हिस सेंटर, सातपूर येथून महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी चोरीला गेल्याची तक्रार होती. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे पथक चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ही चोरी समाधान शिरोळे याने केली असून, तो नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात वावरत आहे.
या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी व पथकाने नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव समाधान अंबादास शिरोळे (वय 27, रा. मु. धारणगाव, पो. देवपूर, ता. सिन्नर, जि. नाशिक) असे सांगितले. अधिक चौकशीदरम्यान आरोपीने 1 सप्टेंबर 2026 रोजी महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीनुसार चोरीस गेलेली सुमारे 20 लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ गाडी अवघ्या 24 तासांत शोधून हस्तगत करण्यात आली असून, चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपीस पुढील कारवाईसाठी जप्त मुद्देमालासह सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात
आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण व सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे प्रभारी पोलीस अधिकारी हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार प्रकाश महाजन व त्यांच्या
पथकाने केली.

Mahindra Scorpio theft case solved

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

17 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

17 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

17 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

18 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

18 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

18 hours ago