नाशिक

कंटेनरने टाटा एसला उडवले; पुढे स्कूल बसवर धडकला

नांदूरशिंगोटे बाह्यवळणावर तिहेरी अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील हॉटेल संग्रामसमोरील कट पॉइंटवरून टाटा एस रस्ता ओलांडत असतानाच भरधाव कंटेनरने तिला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कंटेनर दुसर्‍या लेनमध्ये जाऊन समोरून येणार्‍या रिकाम्या स्कूल बसवर आदळला. नांदूरशिंगोटे बाह्यवळण मार्गावर सोमवारी (दि. 21) दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या या तिहेरी अपघातात टाटा एसचा चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर संगमनेर येथे उपचार सुरू आहेत.
या अपघातात टाटा एसचा चालक हरिभाऊ आनंदा गाडे (48) आणि नारायण एकनाथ घुले (45, रा. टाकळी, ता. अकोले) यांचा मृत्यू झाला. टाटा एसमधील पंढरीनाथ रंगनाथ तिकांडे किरकोळ जखमी झाले असून त्यांना मेडिकव्हर हॉस्पिटल, संगमनेर येथे दाखल करण्यात आले आहे. स्कूलबस विद्यार्थी पोहोच करून रिकामी जात असताना हा अपघात झाला. स्कूल बसचे चालक महेश रामचंद्र जोशी आणि अक्षय दीपक ठोंबरे (रा. घुलेवाडी) हेही किरकोळ जखमी झाले.त्यांच्यावर शेळके हॉस्पिटल, संगमनेर येथे उपचार सुरू आहेत. कंटेनर चालकासही किरकोळ दुखापत झाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, टाटा एस (एमएच 17 बीडी 5670) हॉटेल संग्रामसमोरून नांदूरशिंगोटेकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत होती. त्याचवेळी पुण्याकडून नाशिककडे जाणार्‍या कंटेनर (एनएल 01 एबी 8397) चालकाने टाटा एसला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कंटेनरची टाटा एसला धडक झाली. त्यानंतर कंटेनर पुणे लेन ओलांडून नाशिक लेनमध्ये गेला आणि नाशिकहून पुण्याकडे जाणार्‍या रिकाम्या स्कूल बसला (एमएच 17 बीवाय 9684) धडकला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण, पोलीस हवालदार राहुल निरगुडे, पोलीस नाईक कैलास गोरे, के. डी. पवार, रोशन गायकवाड तसेच महामार्ग पोलीस सिन्नर टॅपचे अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळी मदतकार्य केले.

Container truck rams into Tata Ace; then crashes into a school bus.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मृतदेह बोलत नसतो, पण पोस्टमार्टम सत्य सांगते!

- अफजल पठाण श्वास थांबला म्हणून कहाणी संपत नाही, कधीकधी मृत्यूच्या शांत देहातूनच सत्य बोलतं...…

13 hours ago

यिन-यांग

- वासवदत्ता अग्निहोत्री पहिले बीज की त्या आधी रोप? आधी कोंबडी की आधी अंडी? हे…

14 hours ago

समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी, नवीन सौरतंत्रज्ञान

- डॉ. किशोर पवार जगातील वाढती लोकसंख्या, हवामानबदल आणि पाण्याच्या असमान उपलब्धतेमुळे गोड्या पाण्याची समस्या…

14 hours ago

डिजिटल दरोडा!

- सीमाताई मराठे ‘40 पैसे दिल्याने कोणाचा जीव जात नाही...’ निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या मुखातून बाहेर…

14 hours ago

भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत नवी भरारी

आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताची कामगिरी हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात मर्यादित खेळांमध्ये…

14 hours ago

युद्ध थांबल्याचं तुणतुणं

युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन-युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यावर्षीच्या आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानसह…

14 hours ago