महाराष्ट्र

लालबागच्या राजाच्या व्हीआयपी रांगेबाबत नोटीस

मुंबई डबेवाला असोसिएशननेही व्यक्त केला तीव्र संताप

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील प्रसिद्ध ’लालबागच्या राजा’च्या दर्शनादरम्यान सामान्य नागरिक आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी (व्हीआयपी) स्वतंत्र रांगेबाबत मानवी हक्क आयोगाने नोटीस बजावली आहे. सहा आठवड्यात यावर मंडळाकडून खुलासा मागविण्यात आला आहे. व्हीआयपी आणि सामान्य नागरिक यांच्यात केल्या जाणार्‍या दुजाभावावर मुंबई डबेवाला असोसिएशननेही तीव्र संताप व्यक्त केला आहे. सामान्य भाविकांना तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते, तर दुसरीकडे सेलिब्रिटी आणि व्हीआयपींना मात्र थेट आणि आदरपूर्वक दर्शन दिले जाते.
नुकतेच लालबाग राजा दर्शनाच्या रांगेत जळगावच्या एका 25 वर्षीय तरुणाचा गर्दीत घुसमटून नंतर आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर, मंडळाचे नियोजन कोलमडल्याचा आरोप डबेवाल्यांनी केला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी या भेदभावाला कडाडून विरोध करत, धर्मादाय आयुक्तांनी यात लक्ष घालून लालबागच्या राजाचे ’व्हीआयपी दर्शन’ त्वरित बंद करावे, अशी जोरदार मागणी केली आहे.
एकीकडे व्हीआयपी दर्शनावरून वाद सुरू असतानाच, दुसरीकडे याच जलद दर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लालबागच्या राजाचे लवकर ’चरणस्पर्श दर्शन’ घडवून देण्याचे आमिष दाखवून चार तरुणांकडून 3,400 रुपये उकळल्याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी एका 18 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. एका विद्यार्थ्याने आणि त्याच्या तीन मित्रांनी लवकर दर्शन मिळावे म्हणून आरोपीला प्रत्येकी 850 रुपये दिले होते, मात्र पैसे घेतल्यानंतर त्याने दर्शनही घडवले नाही आणि पैसेही परत करण्यास नकार दिला. याप्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

Notice regarding the VIP queue for Lalbaugcha Raja.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मृतदेह बोलत नसतो, पण पोस्टमार्टम सत्य सांगते!

- अफजल पठाण श्वास थांबला म्हणून कहाणी संपत नाही, कधीकधी मृत्यूच्या शांत देहातूनच सत्य बोलतं...…

14 hours ago

यिन-यांग

- वासवदत्ता अग्निहोत्री पहिले बीज की त्या आधी रोप? आधी कोंबडी की आधी अंडी? हे…

14 hours ago

समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी, नवीन सौरतंत्रज्ञान

- डॉ. किशोर पवार जगातील वाढती लोकसंख्या, हवामानबदल आणि पाण्याच्या असमान उपलब्धतेमुळे गोड्या पाण्याची समस्या…

14 hours ago

डिजिटल दरोडा!

- सीमाताई मराठे ‘40 पैसे दिल्याने कोणाचा जीव जात नाही...’ निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या मुखातून बाहेर…

14 hours ago

भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत नवी भरारी

आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताची कामगिरी हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात मर्यादित खेळांमध्ये…

15 hours ago

युद्ध थांबल्याचं तुणतुणं

युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन-युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यावर्षीच्या आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानसह…

15 hours ago