नाशिक

जबरी चोरीचा गुन्हा उघड; 14.30 लाखांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त

सातपूर पोलीस व गुन्हे शाखा युनिट-2 ची कारवाई

सातपूर : प्रतिनिधी
सातपूर परिसरात धारदार शस्त्राचा धाक दाखवून सोनसाखळ्या हिसकावून नेणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात सातपूर पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट-2ला यश आले आहे. या कारवाईत 14 लाख 30 हजार रुपये किमतीची 105 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त करण्यात
आली आहे.
23 मार्च रोजी रात्री फिर्यादी आपला टेलरिंग व्यवसाय आटोपून चारचाकी वाहनाने घरी जात असताना सातपूर बसस्थानकासमोरील कानिफनाथ मंदिराजवळ तीन अज्ञात इसमांनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी वाहनात जबरदस्तीने प्रवेश करून धारदार चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आणि फिर्यादीच्या गळ्यातील दोन सोन्याच्या चेन हिसकावून पळ काढला.
याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांची ओळख पटली; मात्र ते सातत्याने फरार राहत होते. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकाने जळगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे शोधमोहीम राबविली.
दरम्यान, 28 मे रोजी गुन्हे शाखा युनिट-2ला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मुख्य आरोपी संभाजी विलास कवळे (वय 30, रा. आनंदवली, गंगापूर रोड, नाशिक) हा पंचवटीतील अश्वमेधनगर परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले व अटक केली. तपासादरम्यान आरोपीने चोरीचे सोने जळगाव जिल्ह्यात विकल्याची माहिती दिली. त्यानुसार सातपूर पोलीस व गुन्हे शाखा युनिट-2च्या संयुक्त पथकाने भुसावळ व बोधवड परिसरात तपास करून 14.30 लाख रुपये किमतीची 105 ग्रॅम सोन्याची लगड जप्त केली.
त्यामुळे सातपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेला जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, गुन्हे शाखा युनिट-2चे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ बटुळे तसेच दोन्ही पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी केली. अधिक तपास सातपूर पोलीस करीत आहेत.

Crime of forced theft exposed; Gold items worth Rs 14.30 lakh seized

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 days ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 days ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 days ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 days ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 days ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 days ago