नाशिक

पाच महिन्यांपासून फरार असलेला खंडणीतील आरोपी जाळ्यात

सातु : प्रतिनिधी
खंडणीच्या गुन्ह्यातील पाच महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गंगापूर पोलिसांनी अखेर अटक करून त्याच्या ताब्यातील महिंद्रा थार वाहन जप्त केले आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींचा तातडीने शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. त्यानुसार 17 जानेवारी रोजी ध्रुवनगर परिसरात चेतन अशोक देशमुख याने फिर्यादीकडे 80 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने त्यांना जीवे मारण्याची तसेच किडनी काढून विकण्याची धमकी दिली. यानंतर फिर्यादी यांच्या मालकीची महिंद्रा थार (एमएच 15 जेएक्स 3560) ही गाडी बळजबरीने हिसकावून नेल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांनी आरोपीचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांच्या नेतृत्वाखालील पथक गेल्या पाच महिन्यांपासून आरोपीच्या मागावर होते. मात्र, आरोपी सतत ठिकाणे बदलत असल्याने आणि वेशांतर करून राहत असल्याने तो पोलिसांच्या हाती लागत
नव्हता.
सायबर विभाग व तांत्रिक विश्लेषण शाखेच्या मदतीने आरोपी मुंबई, पुणे तसेच राजस्थानातील चित्तोडगड परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली; मात्र आरोपी प्रत्येकवेळी पोलिसांना चकवा देत पळून जाण्यात यशस्वी होत होता.
दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी चेतन देशमुख हा मालेगाव परिसरात येणार असल्याचे समोर
आले.
त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे व त्यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत तळवाडे गाव परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून फिर्यादी यांची महिंद्रा थार गाडीही जप्त करण्यात आली असून, आरोपीला अटक करण्यात
आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे, पोलीस निरीक्षक काजल मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे तसेच गिरीश महाले, भागवत थविल, प्रवीण केदारे, गोरख साळुंके, तुळशीदास चौधरी, सुजित जाधव आणि तुषार सोनवणे यांच्या पथकाने पार पाडली. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे करीत आहेत.

Extortion accused who had been absconding for five months caught

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 days ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 days ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 days ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 days ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 days ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 days ago